गंभीर प्रश्नांकडे विनोदी शैलीने पहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 17:11 IST2016-06-22T11:41:39+5:302016-06-22T17:11:39+5:30

प्रश्न पाण्याचा असो वा धार्मिक. महत्वाच्या प्रश्नांना विनोदी शैलीने सोडविण्याचे, त्यावर उपाय सुचविण्यासंदर्भात चित्रपट तयार करण्याचे काम तौसिफ ए. ...

See serious questions in a comedy style | गंभीर प्रश्नांकडे विनोदी शैलीने पहा

गंभीर प्रश्नांकडे विनोदी शैलीने पहा

रश्न पाण्याचा असो वा धार्मिक. महत्वाच्या प्रश्नांना विनोदी शैलीने सोडविण्याचे, त्यावर उपाय सुचविण्यासंदर्भात चित्रपट तयार करण्याचे काम तौसिफ ए. काझी यांनी केले आहे. 
महत्वाच्या प्रश्नांसदर्भात आपण बोलतो, चर्चा करतो, परंतू नेमके काय केले पाहिजे, यासंदर्भात काहीही करत नाही. हेच लघुपटांच्या माध्यमातून काझी यांनी दर्शविले आहे. हिंदी आणि दखनी भाषेच्या माध्यमातून त्यानी ‘पानी रे पानी’ हा चित्रपट तयार केला. पाण्याची किंमत वाढलेली असताना, त्याशिवाय पाण्याच्या दुर्भिक्षामुळे किडनी स्टोनसारख्या होणाºया आजारांवर हा लघुपट प्रकाश टाकतो.
या चित्रपटाच्या सुरुवातीला यामधील पात्र मायानंद ठाकूर आणि कबीर अशा रितीने बसलेले दाखविण्यात आले आहेत, ज्यांना किडनीचा त्रास असतो. 
तौसिफ काझी यांनी सांगितले की, लोकांना शिक्षण देणे हा आमचा उद्देश होता. विनोदाच्या अंगाने हे सांगितले तर लोकांना अधिक लवकर कळते. मी स्वत: याची स्क्रिप्ट लिहिली आणि संवाद लिहिले. मोठ्या दर्शकांना हे कळावे हा यामागचा हेतू होता. 
तजल्ली प्रॉडक्शनच्या माध्यमातून त्यांनी एकता, अखंडता आणि सामाजिक प्रश्नांवर लघुपट तयार केले. तजल्ली प्रॉडक्शन हे नवीन आहे. मी दोन वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतो आहे. 
अभिनेता मायानंद ठाकूरच्या अनुसार ‘स्क्रीप्टमुळे मी या प्रोजेक्टवर काम करतो आहे. लोकांना सुरक्षित पाण्याचे राहू द्या साधे पाणीही आपण देऊ शकत नाही. काही क्षणाचा माझा रोल आहे. दोन दिवस मी शुटींग केले. पानी रे पानी यू ट्यूबवरही आहे. 

Web Title: See serious questions in a comedy style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.