SEE PICS: FIR फेम कविता कौशिकने मेंहदी आणि हळदीचे खास फोटो शेअर केले सोशलमीडियावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 16:04 IST2017-01-25T10:32:19+5:302017-01-25T16:04:58+5:30
'एफआयआर' फेम चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक बॉयफ्रेंड रोनित बिस्वाससह 27 तारखेला रेशीमगाठीत अडकणार आहे. नुकतेच तिचे हळदीचा कार्यक्रम ...

SEE PICS: FIR फेम कविता कौशिकने मेंहदी आणि हळदीचे खास फोटो शेअर केले सोशलमीडियावर
' ;एफआयआर' फेम चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक बॉयफ्रेंड रोनित बिस्वाससह 27 तारखेला रेशीमगाठीत अडकणार आहे. नुकतेच तिचे हळदीचा कार्यक्रम सोहळा मोठ्या थाटात पार पडला.यावेळी कौशिकने एक पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. चेह-याला हळद लावल्याचे फोटो तिने सोशलमीडियावर शेअर केले आहेत.यावेळी कविता आणि रोनितच्या कुटुंबियांसोबत तिचे जवळचे मित्र मैत्रिणी सहभागी झाले होते. लग्नबंधनाता अडकत असल्यामुळे एक वेगळाच आनंद कविताच्या चेह-यावर दिसत होता. या सेरेमनीवेळी यावेळी कविता, रोनित, आश्का आणि त्यांच्या इतर मित्रांनी 'सरकायलो खटिया जाडा लगे' आणि 'जुम्मा चुम्मा देदे' या गाण्यांवर ताल धरला होता. जास्त गाजावाजा न करता अगदी साध्या पध्दतीत 27 जानेवारी रोजी केदारनाथच्या शिव-पार्वती मंदिरात कविता आणि रोनित रेशीमगाठीत अडकणार आहेत.या दिवशी दोघांना आर्शिवाद देण्यासाठी दोघांचे कुटुंबीय आणि काही निवडक फ्रेंड्स केदारनाथला उपस्थित राहणार आहेत. ''हिमालयात वातावरण सध्या चांगलेच थंड आहे. तिथे बर्फ पडत असल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे सगळ्या कुटुंबीयांना आणि मित्रमैत्रिणींना लग्नासाठी तिथे घेऊन जाणे शक्य नाहीये.त्यामुळे केवळ आम्ही 15 जणच लग्नासाठी जाणार आहोत. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असावेत ही एकच इच्छा'' असल्याचे कविता कौशिकने म्हटले आहे.कविता कौशिक आणि अभिनेता नवाब शहा या दोघांचे पाच वर्ष अफेअर सुरू होते. दोघांनाही एकमेकांसह लग्न करायचे होते. मात्र दोघांचाही धर्म वेगवगेळा असल्याने कुटुंबानी यांच्या लग्नाला नकार दिला होता.कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दोघांनाही लग्न करायचे नव्हते त्यामुळे दोघांनीही संगनमताने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला.
ALSO READ:5 वर्षाचं नातं तुटलं !
![]()
![]()
ALSO READ:5 वर्षाचं नातं तुटलं !