SEE PICS: बिग बॉस कंटेस्टंट लोकेश कुमारीने नवीन शोसाठी केला मेकओव्हर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 12:22 IST2017-01-03T11:57:26+5:302017-01-03T12:22:42+5:30

आपल्या अनोख्या स्टाइलने बिग बॉस सिझन 10 मध्ये एंट्री मिळवलेली लोकेश कुमारीने नवीन वर्षाची सुरूवात अगदी हटके केली आहे.होय,बिग ...

SEE PICS: Big Boss Contestant Lokesh Kumari Banerjee Makeover For New Show? | SEE PICS: बिग बॉस कंटेस्टंट लोकेश कुमारीने नवीन शोसाठी केला मेकओव्हर?

SEE PICS: बिग बॉस कंटेस्टंट लोकेश कुमारीने नवीन शोसाठी केला मेकओव्हर?

ल्या अनोख्या स्टाइलने बिग बॉस सिझन 10 मध्ये एंट्री मिळवलेली लोकेश कुमारीने नवीन वर्षाची सुरूवात अगदी हटके केली आहे.होय,बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर लोकेश कुमारीने तिच्या लुक्सवर खूप मेहनत घेत अगदी बोल्ड फोटोशुट केले आहे.तिने स्वतःतिचे काही खास बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.तिचा हा निराळा अंदाज पाहून तुम्हाला आश्चर्य नाही वाटले तरच नवल. 


तिच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे ती स्वामी ओमप्रमाणेच सलमान खानचीही फेव्हरेट कंटेस्टंट होती.'विकेंड का वार' या खास भागात सलमान लोकेश कुमारीची मिमिक्री करत संवाद साधायचा.तिच्या बोलण्याच्या खास स्टाइलमुळेच तिला बिग बॉस सिझन 10 मध्ये एंट्री मिळाली होती.लोकेश कुमारीला बिग बॉसच्या घरातील इतर कंटेस्टंट तिचीच कॉपी करत चिडवायचे.लोकेश कुमारी या देसी गर्लचे चालणे बोलणे इतरांपेक्षा खूप वेगेळे होते.त्यामुळे तीने काही प्रमाणात तिच्या खास स्टाइलने प्रेक्षकांना एंटरटेन केलेही.त्यानंतर घरातून नॉमिनेट होत ती बाहेर पडली.काही दिवपांपूर्वीच विंदु दारासिंह आणि रवी किशनसह लोकेशकुमारीने बिग बॉसमध्ये हजेरी लावली होती.त्यावेळीही या देसी गर्लमध्ये कमालीचा बदला पाहायला मिळाला या देसी गर्लसाठी बिग बॉसचे10 सिझन जिंकणे शक्य झाले नसले तरीही तिने प्रेक्षकांवर तिची वेगळी छाप पाडलीय.



यंदा सेलिब्रेटी आणि कॉमनर्स अशा दोन कॅटगिरीचे कंटेस्टंट या घरात पाहायला मिळाले. कॉमनर्स म्हणून लोकेश कुमारीची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली होती.मात्र आता या शोमधील कॉमनर्स मानले जाणारे कंटेस्टंट ही सेलिब्रेटी बनताना दिसतायेत. त्यातली लोकेश कुमारीही आता सगळ्यांसाठी सेलिब्रेटी बनल्याचे पाहायला मिळातंय.अचानक या देसी गर्लचा बदलेला हा हॉट अंदाज लवकरच नवीन शोमधून ऑनस्क्रीन झळकला तर आश्चर्य वाटायला नको. 

Web Title: SEE PICS: Big Boss Contestant Lokesh Kumari Banerjee Makeover For New Show?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.