पाहाः कुशल बद्रिके,भारत गणेशपुरे यांची घरी होते अशी अवस्था,पाहून तुम्हीही म्हणाल चला हवा येऊ द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 10:41 IST2017-10-04T05:11:46+5:302017-10-04T10:41:46+5:30

छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या शोमधील विनोदवीरांनी आपल्या अनोख्या अंदाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. कॉमेडीचे धम्माल ...

See: Efficient Badrike, Bharat Ganeshpura was in his house, seeing that you will also say, let's come! | पाहाः कुशल बद्रिके,भारत गणेशपुरे यांची घरी होते अशी अवस्था,पाहून तुम्हीही म्हणाल चला हवा येऊ द्या!

पाहाः कुशल बद्रिके,भारत गणेशपुरे यांची घरी होते अशी अवस्था,पाहून तुम्हीही म्हणाल चला हवा येऊ द्या!

ट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या शोमधील विनोदवीरांनी आपल्या अनोख्या अंदाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. कॉमेडीचे धम्माल टायमिंग, स्कीट करतानाच्या हरकती यामुळे थुकरवाडीतील या विनोदवीरांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. धम्माल मस्ती करताना उपस्थित सेलिब्रिटींसह काय करतील याचा नेम कुणालाही नसतो. तसंच स्कीट करताना ही मंडळी स्वतःवरही विनोद करायला मागेपुढे पाहत नाही. ओघाने कधी कधी त्यांच्या घरच्या मंडळींचा उल्लेखही त्यांच्या स्कीटमध्ये येतो. मात्र ही मंडळी घरी काय करतात, त्यांची अवस्था कशी असते हे रसिकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. रसिकांची हीच इच्छा पूर्ण केलीय याच विनोदवीरांपैकी एक असलेल्या अभिनेता कुशल बद्रिकेने. रसिकांना हसून हसून लोटपोट करणा-या कलाकारांची घरी काय अवस्था असते हे दाखवणारे फोटो कुशल बद्रिकेने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहेत.


या फोटोत अभिनेता भारत गणेशपुरे लादी पुसताना पाहायला मिळत आहे. स्वतः कुशल बद्रिके हा भांडी घासताना दिसत आहे.
सागर कारंडे तर साफसफाई करताना आणि श्रेया बुगडे चहाचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहे.




अरे संसार संसार… झाडू, लादी, भांडी कर… तुला दिली रे देवाने… एक बायको डोक्यावर... अशी पोस्टही कुशलने या फोटोसह टाकली आहे. कुशलच्या या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे. रसिकांना आपल्या लाडक्या विनोदवीरांचा हा अवतार चांगलाच भावल्याचं यावरुन पाहायला मिळत आहे.

cnxoldfiles/a>, सोनम कपूर, कंगणा राणौत, विद्या बालन,श्रीदेवी या कार्यक्रमात हजेरी लावत फुल ऑन मस्ती केली. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी या मंचावर हजेरी लावत त्यांचा मराठमोळा अंदाजही पाहायला मिळाला. मराठी भाषाही बोलता येत नसली तरीही या भाषेतला गोडवा समजून स्वत:ही खूप मजा मस्ती करताना दिसले. त्यामुळे बी-टाऊनची मंडळी या मराठमोळ्या अंदाजाच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले.थुकरटवाडीत अर्थात चला हवा येऊ द्या या मराठमोळ्या शोमध्ये येण्यासाठी प्रत्येक सेलिब्रेटींमध्ये उत्साह असल्याचे पाहायला मिळतो.

Web Title: See: Efficient Badrike, Bharat Ganeshpura was in his house, seeing that you will also say, let's come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.