​बिग बॉसमध्ये दुसऱ्याच दिवशी सुरू झाला नॉमिनेशनचा खेळ, हे स्पर्धक झाले नॉमिनेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 17:35 IST2017-10-03T12:05:19+5:302017-10-03T17:35:19+5:30

बिग बॉस सुरू होऊन दोन दिवसच झाले असताना आता बिग बॉसच्या घरातल्यांना घरातील एका स्पर्धकाला नॉमिनेट करावे लागणार आहे. ...

On the second day in the Bigg Boss, the nomination game was started, the nominee was nominated | ​बिग बॉसमध्ये दुसऱ्याच दिवशी सुरू झाला नॉमिनेशनचा खेळ, हे स्पर्धक झाले नॉमिनेट

​बिग बॉसमध्ये दुसऱ्याच दिवशी सुरू झाला नॉमिनेशनचा खेळ, हे स्पर्धक झाले नॉमिनेट

ग बॉस सुरू होऊन दोन दिवसच झाले असताना आता बिग बॉसच्या घरातल्यांना घरातील एका स्पर्धकाला नॉमिनेट करावे लागणार आहे. बिग बॉसच्या घरात येऊन स्पर्धक सेटल व्हायच्या आतच नॉमिनेशन सुरू झाले असल्यामुळे बिग बॉसच्या सगळ्या स्पर्धकांना चांगलाच धक्का बसला आहे. कोणाला नॉमिनेट करायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे आणि त्यातही प्रत्येक स्पर्धकाने त्यांना कोणाला नॉमिनेट करायचे आणि का नॉमिनेट करायचे हे सगळ्यांच्या समोर सांगायचे आहे. त्याचसोबत नॉमिनेशनसाठी सगळ्यांना कारण देखील द्यायचे आहे आणि यावरून स्पर्धकांमध्ये चांगलीच भांडणं रंगली आहेत.
बिग बॉसच्या दुसऱ्याच दिवशी विकास गुप्ता आणि आकाश यांच्यात चांगलीच भांडणे होणार आहेत. डिनर टेबलवर चर्चा करता करता विकास गुप्ता आकाशवर प्रचंड चिडणार आहे. एवढेच नव्हे तर विकास रागाच्या भरात आकाशला चांगलाच सुनावणार आहे. तू या कार्यकर्मासाठी योग्यच नाही असे तो त्याला बोलणार आहे. आकाशला प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त रस असल्याचे देखील तो त्याला बोलणार आहे. तसेच आकाशला त्याची वागणूक सुधारण्याची गरज असल्याचे देखील तो त्याला ऐकवणार आहे. या भांडणात शिल्पा आकाशची बाजू घेऊन विकासशी भांडणार आहे. 
विकास आणि शिल्पाचे बिग बॉसच्या घरात येण्याआधीपासूनच वाकडे आहे. भाभीजी घर पर है या कार्यक्रमाचे निर्माते संजय कोहली यांनी तिचा मानसिक छळ केला असल्याचे तिने म्हटले होते. या कारणामुळे तिने ही मालिका देखील सोडली होती. शिल्पाने त्यानंतर प्रचंड गोंधळ घातला होता. हे प्रकरण तिने एका पक्षापर्यंत देखील नेले होते. या मालिकेचे प्रसारण अँड टिव्हीवर होत होते आणि विकास हा अँड टिव्हीचा प्रोग्रमिंग हेड होता. त्यामुळे विकास आणि शिल्पा यांच्यात तेव्हापासूनच भांडणं आहेत. त्यामुळे हा इतिहास पाहाता बिग बॉसच्या घरात त्यांच्यात रोजच भांडणे पाहायला मिळणार आहेत आणि आता त्या भांडणांना सुरुवात देखील झाली आहे.
या आठवड्यात शिल्पा शिंदे, झुबीर खान, अर्शी खान, ज्योती कुमार आणि बंदगी कार्ला हे स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर होण्यासाठी नॉमिनेट होणार असल्याचे कळतंय. 

Also Read : ​तुम्हाला माहीत आहे का बिग बॉस ११चा स्पर्धक हितेन तेजवानीचे गौरी प्रधानसोबत आहे दुसरे लग्न

Web Title: On the second day in the Bigg Boss, the nomination game was started, the nominee was nominated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.