'कॉन्स्टेबल मंजू'मध्ये सत्या आणि मंजूची लग्नसराई! मालिकेत किरण गायकवाडची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 17:02 IST2024-05-20T16:55:53+5:302024-05-20T17:02:33+5:30
Constable Manju Serial : 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेत पण लग्न समारंभ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'कॉन्स्टेबल मंजू'मध्ये सत्या आणि मंजूची लग्नसराई! मालिकेत किरण गायकवाडची एन्ट्री
‘सन मराठी’वरील 'कॉन्स्टेबल मंजू' (Constable Manju Serial) या मालिकेत पण लग्न समारंभ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सत्या आणि मंजूच्या लग्नाच्या निमित्ताने या मालिकेत होणार आहे सेलिब्रिटीची एंट्री, ज्याला बघता क्षणी लग्नात उपस्थित पाहुणे त्याच्या पाठी पडणार आणि तो मित्र म्हणजे सत्याचा सच्चा मित्र अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad). ज्याच्या येण्याने लग्न समारंभ विशेष गाजणार आहे.
एकीकडे सत्या आणि मंजूच्या लग्नात पोलिस गुंड गण्या फिरंगीच्या शोध मोहिमेवर असतात तर दुसरीकडे लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड पाहुणे मंडळींची नजर आपल्यावर पडू नये आणि थेट सत्याची भेट होऊन देत या हेतूने स्वत:चा चेहरा लपवून सत्याच्या लग्नात येतो आणि सत्याला भेटण्यासाठी निघतो. आता पोलिसांच्या तावडीत भेटलेला किरणच्या बाबतीत नेमकं घडणार काय... पाहुण्यांसमोर किरणचा चेहरा सगळ्यांसमोर आल्यावर किरण काय करणार... हे सगळं तुम्हांला जाणून घ्यायचं असेल तर सत्या आणि मंजूच्या लग्नाला तुम्हांला यावेच लागेल. ही सगळी धमाल, गोंधळ, गंमत अनुभवण्यासाठी मालिका पाहावी लागेल.
मित्र या नात्याने किरणची सत्यासाठी असलेली मैत्रीची जाणीव, आपुलकी प्रेक्षकांना नवीन एपिसोड्समध्ये दिसून येणार आहे. किरण गायकवाडची स्पेशल एंट्री, पोलिसांनी घेरलेल्या किरणची मस्ती, गंमत, सत्या आणि मंजूचं लग्न मिशन उर्फ लग्नसराई ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेमध्ये २० मे ते २७ मे रात्री ८ वाजता पाहायला मिळेल.