​स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' मध्ये दादूस अर्थात संतोष चौधरीचा धमाकेदार परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 17:23 IST2018-03-28T11:53:07+5:302018-03-28T17:23:07+5:30

स्टार प्रवाहने नेहमीच नवीन आणि अनुभवी कलाकारांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अनेक सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले दादूस ...

Satoshi Chowdhury's bang performance in 'Little Rubbish' in Star Stream | ​स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' मध्ये दादूस अर्थात संतोष चौधरीचा धमाकेदार परफॉर्मन्स

​स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' मध्ये दादूस अर्थात संतोष चौधरीचा धमाकेदार परफॉर्मन्स

टार प्रवाहने नेहमीच नवीन आणि अनुभवी कलाकारांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अनेक सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले दादूस अर्थात संतोष चौधरी यांच्या धमाकेदार गाण्य़ाचा परफॉर्मन्स स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आगरी कोळी हळदीच्या गाण्यासाठी लोकप्रिय असलेले लाडके दादूस त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांनी धमाल उडवून देणार आहेत.
'छोटी मालकीण' या मालिकेतील रेवतीच्या आयुष्याला आता एक कलाटणी मिळणार आहे. रेवतीचे लग्न होणार की नाही, अशी वेळ आलेली असताना घरातला नोकर श्रीधर तिच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवतो. आपल्या छोट्या मालकीणीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा तो निश्चय करतो. या लग्नादरम्यान मानपानावरून बराच गोंधळ उडतो, रुसवे-फुगवेही होतात. श्रीधर आणि रेवाच्या लग्नाच्या हळदीचा रंग चढणार आहे तो दादूसच्या दमदार परफॉर्मन्समुळे. दादूस त्यांच्या गाण्याने हळदीचा कार्यक्रम कसा रंगवतात हे पाहाणे उत्सुकतेचे ठरेल. श्रीधर आणि रेवाच्या हळदीत दादूसचा धमाकेदार परफॉर्मन्स दर्शकांना २९ आणि ३० मार्च रोजी रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.
छोटी मालकीण या मालिकेत अक्षर कोठारी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत पिळदार मिशी असलेल्या रांगड्या लुकमध्ये प्रेक्षकांना त्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेत तो श्रीधर ही व्यक्तिरेखा साकारत असून आपल्या व्यक्तिरेखेवर नेहमीच मेहनत घेणाऱ्या अक्षरने 'छोटी मालकीण'साठीही खास मेहनत घेतली आहे तर एतशा संझगिरी या मालिकेत छोटी मालकिणची भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती 'रेवती' ही भूमिका साकारत आहे. एतशाने सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर ती नोकरीही करत होती. मात्र, नोकरीत काही मन रमत नव्हते. कथ्थकचे शिक्षण घेत असल्याने परफॉर्मन्सची भीती वाटत नव्हती. अशातच तिच्या समोर संधी चालून आली ती एका सौंदर्य स्पर्धेची. त्यात तिची अंतिम फेरीसाठी निवड झाली. तिला एक पुरस्कारही मिळाला आणि तिचे नशीब पालटले.

Also Read : 'छोटी मालकीण' या मालिकेतील अक्षर कोठारीचा लूक तुम्ही पाहिला का?

Web Title: Satoshi Chowdhury's bang performance in 'Little Rubbish' in Star Stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.