​सारेगमप लिटल चॅम्प्सने सादर केले दमदार परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:25 IST2017-09-08T11:55:43+5:302017-09-08T17:25:43+5:30

सारेगमप लिटल चॅम्प्स या रिॲलिटी शोने प्रेक्षकांनी चांगलीच मने जिंकली आहेत. प्रत्येक स्पर्धक दर आठवड्‌याला आपले सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स सादर ...

Saregupam Little Champs performed strong performance | ​सारेगमप लिटल चॅम्प्सने सादर केले दमदार परफॉर्मन्स

​सारेगमप लिटल चॅम्प्सने सादर केले दमदार परफॉर्मन्स

रेगमप लिटल चॅम्प्स या रिॲलिटी शोने प्रेक्षकांनी चांगलीच मने जिंकली आहेत. प्रत्येक स्पर्धक दर आठवड्‌याला आपले सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करत आहेत. या कार्यक्रमात स्पर्धकांना नुकतेच एका चॅलेन्जला सामोरे जावे लागले. 
या कार्यक्रमातील टॉप दहा स्पर्धकांना ज्यूरी सदस्यांनी खुली आव्हाने दिली. कोलकाता सेन्सेशन श्रेयन भट्टाचार्यला ज्यूरी सदस्य रामशंकर यांनी आव्हान दिले. त्याला म्युझिशियन स्टेफन देवासीसोबत हमारी अधुरी कहानी या गाण्यावर जुगलबंदी सादर करायची होती आणि त्याने या गाण्यावर अफलातून परफॉर्मन्स सादर केला. त्याच्या गाण्याने प्रभावित होऊन मेन्टॉर जावेद अली म्हणाला, श्रेयन या शो चा विजेता बनू शकतो. 
श्रेयननंतर युम्ना अजिनने ज्यूरी सदस्य अरविंदर सिंग यांनी दिलेल्या आव्हानानुसार प्यार दो प्यार लो गाणे सादर केले. त्याचे गाणे सगळ्यांनी डोक्यावर घेतले. ज्यूरी सदस्य किरण कामथ यांच्या आव्हानानुसार वैष्णवला मल्हारी आणि झिंगाटच्या ठेक्यावर अतिशय उत्साह आणि पूर्ण ऊर्जेने परफॉर्मन्स सादर करायचे होते आणि त्याने ते केले. एवढेच नाही तर ज्यूरींना सुद्धा त्याने नाचवले. त्याच्या गाण्याने प्रभावित होऊन मेन्टॉर नेहा कक्करने त्याला पुन्हा परफॉर्मन्स सादर करण्याची विनंती केली. ज्यूरी सदस्य राजा हसनने दिलेल्या आव्हानाला न्याय देत सोनाक्षीने तिचा परफॉर्मन्स सादर केला. हा परफॉर्मन्स पाहून सगळेच थक्क झाले होते. लिटल चॅम्प आफताब सिंगला ज्यूरी सदस्य शमशेरने पंजाबी गाण्याचे आव्हान दिले होते. 
या सगळ्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्सबद्दल मेन्टॉर हिमेश रेशमिया सांगतो, “कलेला वयाचे बंधन नसते. या मुलांना इथे परफॉर्म करताना पाहण्याचा अनुभव खूपच चांगला असतो.

Also Read : ​अक्षय खन्नाला सारेगमप लिटिल चॅम्पसमध्ये का अावरले नाही अश्रू?

Web Title: Saregupam Little Champs performed strong performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.