'सारेगमप' लिटिल चॅम्प्स फेम प्रथमेश- मुग्धा लवकरच बांधणार लग्नगाठ, स्पिनटर्स पार्टीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 04:50 PM2023-12-11T16:50:55+5:302023-12-11T16:51:28+5:30

'सारेगमप' लिटिल चॅम्प्समुळे प्रसिद्धीझोतात आलेले गायक प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. जून २०२३मध्ये त्या दोघांनी जाहीररित्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडाही पार पडला.

'Saregamp' Little Champs fame Prathamesh-Mugdha too will tie the knot soon, spinsters party photos surfaced | 'सारेगमप' लिटिल चॅम्प्स फेम प्रथमेश- मुग्धा लवकरच बांधणार लग्नगाठ, स्पिनटर्स पार्टीचे फोटो आले समोर

'सारेगमप' लिटिल चॅम्प्स फेम प्रथमेश- मुग्धा लवकरच बांधणार लग्नगाठ, स्पिनटर्स पार्टीचे फोटो आले समोर

'सारेगमप' लिटिल चॅम्प्समुळे प्रसिद्धीझोतात आलेले गायक प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. जून २०२३मध्ये त्या दोघांनी जाहीररित्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडाही पार पडला. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान आता मुग्धाच्या स्पिनस्टर्स पार्टीचे फोटो समोर आले आहेत.

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकतेच मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून मैत्रींणींने केलेल्या ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर रिशेअर केले असून सध्या या फोटोंची चर्चा होत आहे. याच पार्टीवरून प्रथमेश- मुग्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.

दरम्यान, मुग्धा वैशंपायन हिची बहिण मृदुलचे अलिबागचे प्रसिद्ध व्यावसायिक विश्वजीत जोगळेकरसोबत लग्न झाले आहे. आता मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मुग्धा आणि प्रथमेश लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 'मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये प्रथमेशला लाडाने मोदक आणि मुग्धाला मॉनिटर म्हणले जायचे. मोदक आणि मॉनिटरचं सूत जुळलंय याची शंका खरंतर सर्वांना आलीच होती. दोघांचे एकत्रित गायनाचे फोटो, व्हिडिओ, नयनरम्य परिसरात शूट केलेले गाण्याचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर खूप पसंत केले जायचे. चाहत्यांना तर तेव्हाच दोघांमध्ये काहीतरी आहे अशी शंका होती. 'मोदक गॉट मॉनिटर' असं म्हणत त्यांनी एकमेकांच्या हातात हात दिलेला एक गोड फोटो शेअर केला. तुम्ही सगळेच आमच्याकडून ज्या कबुलीची वाट पाहत होता तर आम्ही सांगतो. होय आमचं ठरलंय, अशा कॅप्शनसह त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

Web Title: 'Saregamp' Little Champs fame Prathamesh-Mugdha too will tie the knot soon, spinsters party photos surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.