सरस्वती मालिकेने पूर्ण केला ५०० भागांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 13:51 IST2017-07-25T08:21:06+5:302017-07-25T13:51:06+5:30

नात्यात प्रेम आणि विश्वास असेल तर कुठलंही संकट सहज पार पाडता येतं, यावर सरस्वतीने विश्वास ठेवत अनेक अडचणींवर मात ...

The Saraswati series completed the phase of 500 episodes | सरस्वती मालिकेने पूर्ण केला ५०० भागांचा टप्पा

सरस्वती मालिकेने पूर्ण केला ५०० भागांचा टप्पा

त्यात प्रेम आणि विश्वास असेल तर कुठलंही संकट सहज पार पाडता येतं, यावर सरस्वतीने विश्वास ठेवत अनेक अडचणींवर मात केली. या मालिकेला खास करून सरस्वती आणि राघवला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. प्रेक्षकांच्या लाभलेल्या उदंड प्रतिसादामुळेच सरस्वती या मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले आहेत. 
सरस्वती या मालिकेला ५०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने मिळून पार्टी केली. या पार्टीला मालिकेच्या कलाकारांसोबतच मालिकेचे तंत्रज्ञ देखील उपस्थित होते. तसेच या मालिकेची निर्माती अभिनेत्री मनवा नाईक आणि तिचे पती सुशांत तुंगारे देखील पार्टीला आवर्जून उपस्थित होते. या मालिकेच्या टीमने केक कापून त्यांचा आनंद साजरा केला. या मालिकेमध्ये नुकतीच देविका म्हणजेच जुई गडकरीची एन्ट्री झाली आहे. तिच्या येण्याने सरस्वती आणि राघवच्या आयुष्यात काय बदल होणार आहे? सरस्वती मालिकेला कुठलं नवीन वळण मिळणार आहे हे पाहाणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.
सरस्वती आणि राघव एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. पण ते दोघे दुबईला फिरायला गेले असता तिथे राघववर हल्ला झाला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असे सगळे समजत होते. पण तो नुकताच परतला आहे. पण हा हल्ला सरस्वतीनेच केला असल्याचे त्याला वाटत असल्याने त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.
सरस्वती–राघवच्या या दोन वर्षांच्या प्रवासामध्ये खूप अडचणी आल्या. पण त्यात सरस्वती खंबीरपणे उभी राहिली. यामुळे लोकांना सरस्वती आपल्याच घरातली वाटू लागली आहे. या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर या मालिकेला एक नवे वळण मिळणार आहे. 

Also Read : सरस्वतीचा नवा लूक तुम्ही पाहिला का?

Web Title: The Saraswati series completed the phase of 500 episodes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.