​साराभाई व्हर्सेस साराभाई पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 13:22 IST2017-12-21T07:52:12+5:302017-12-21T13:22:12+5:30

साराभाई व्हर्सेस साराभाई पुन्हा सुरू करा अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रेक्षक करत होते. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर ११ वर्षांनी ...

Sarabhai visits Sarabhai next year's visit to the audience | ​साराभाई व्हर्सेस साराभाई पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

​साराभाई व्हर्सेस साराभाई पुढच्या वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

राभाई व्हर्सेस साराभाई पुन्हा सुरू करा अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रेक्षक करत होते. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर ११ वर्षांनी साराभाई व्हर्सेस साराभाई टेक टू ही मालिका वेबसिरिजच्या रूपाने प्रेक्षकांना पाहायला मिळाली. साराभाई व्हर्सेस साराभाईच्या पहिल्या सिझनमध्ये रत्ना पाठक, सतिश शहा, रुपाली गांगुली, राजेश कुमार आणि सुमित राघवन यांच्या मुख्य भूमिका होत्या. साराभाईच्या वेबसिरिजमध्ये देखील प्रेक्षकांना हीच स्टार कास्ट पाहायला मिळाली होती. या वेबसिरिजने प्रेक्षकांचे खूप चांगले मनोरंजन केले. पण साराभाई व्हर्सेस साराभाई या कार्यक्रमाचे केवळ दहाच भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यामुळे या कार्यक्रमाच्या फॅन्सची चांगलीच निराशा झाली होती. पण आता या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली गुड न्यूज आहे. साराभाई व्हर्सेस साराभाई ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या विषयी स्वतः या कार्यक्रमाचे निर्माते जे.डी.मजेठिया यांनी सांगितले आहे. 
जे.डी.मजेठियाची निर्मिती असलेली खिचडी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक तसेच सुप्रिया पाठक हे कलाकार नव्या आवृत्तीतही कायम ठेवण्यात आले आहेत. जुन्या कलाकारांप्रमाणे काही नवे कलाकार देखील आता या मालिकेचा भाग असणार आहेत. ही मालिका ही केवळ ५२ भागांची बनवण्याचे या मालिकेच्या निर्मात्यांनी ठरवले आहे. खिचडी ही मालिका नेहमीच प्रेक्षकांची आवडती मालिका राहिली आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. पण नेहमीच या मालिकेचा टिआरपी चांगला असतानाच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्याचप्रमाणे या सिझनला देखील प्रेक्षकांना या मालिकेचे ५२ भागच पाहाता येणार आहेत. पण खिचडी ही मालिका संपल्यानंतर जे. डी आणि त्याची टीम त्यांच्या आणखी एका मालिकेवर काम करायला सुरुवात करणार आहेत.
खिचडी या मालिकेनंतर प्रेक्षकांची आवडती मालिका साराभाई व्हर्सेस साराभाई पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खिचडी मालिका संपल्यावर साराभाईच्या नव्या सिझनवर या मालिकेची टीम काम करणार आहे. याविषयी जे.डी.मजेठिया सांगतात, खिचडी आणि साराभाई या दोन्ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. सध्या आमची टीम खिचडीवर
काम करत आहे. खिचडी मालिका संपल्यानंतर आम्ही साराभाई व्हर्सेस साराभाईवर काम करणार आहोत. त्यामुळे पुढील वर्षी साराभाई ही मालिका नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. 

Also Read : रेणुका शहाणे सांगतेय सुप्रिया पाठक माझ्या ऑल टाईम फेव्हरेट लेडी डॉन

Web Title: Sarabhai visits Sarabhai next year's visit to the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.