संजय जाधव करणार परीक्षण !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 04:22 PM2020-01-06T16:22:16+5:302020-01-06T16:23:49+5:30

सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शन आणि अभिनेता या सर्व भूमिका संजय जाधव यांनी निभावल्या आहेत.

Sanjay Jadhav On Small Screen | संजय जाधव करणार परीक्षण !

संजय जाधव करणार परीक्षण !

googlenewsNext

तुमच्यामध्ये जर अभिनयाचा किडा असेल, जर तुम्हाला अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक उत्तम मंच हवा असेल, जर तुम्हाला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून मार्गदर्शन हवं असेल. तर 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' हा कार्यक्रम पुन्हा एकदा हि संधी घेऊन आला आहे. या कार्यक्रमाने १० वर्षांपूर्वी अनेक उदयोन्मुख कलाकारांसाठी उत्तम मंच उपलब्ध करून दिला. या मंचाने अनेक कलाकार देखील दिले आहेत जे आज त्यांच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला हवा हवासा असलेला हा मंच पुन्हा एकदा येतोय हि सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक टॅलेंटेड युवकांना आपली कला सादर करण्याची हि सुवर्ण संधी मिळेल.

 

या मंचावरून पुढे आलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या पर्वाच सूत्रसंचालन करताना पाहायला मिळेल. पण या कार्यक्रमाचं परीक्षण कोण करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. सगळ्यांचे लाडके दिगदर्शक संजय जाधव या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसतील. संजय जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांची हटके स्टाईल आणि प्रतिभा त्यांच्या चित्रपटातून झळकते. सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शन आणि अभिनेता या सर्व भूमिका संजय जाधव यांनी निभावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कडून स्पर्धकांना चांगलंच मार्गदर्शन मिळेल यात शंकाच नाही.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना संजय जाधव म्हणाले, "मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे. मी जरी परीक्षकाची भूमिका निभावत असलो तरीही मी कुठलही दडपण घेतलं नाही आहे. हा एक उत्तम मंच आहे आणि स्पर्धकांनी त्यांच्या टॅलेंटच चांगल्याप्रकारे सादरीकरण करून स्पर्धेत पुढे जावं हेच मी त्यांना सांगू इच्छितो."
 

Web Title: Sanjay Jadhav On Small Screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.