नव्या वर्षात मराठी अभिनेत्रीने स्वीकारलं ७५ दिवसांचं चॅलेंज, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:36 IST2026-01-07T13:35:38+5:302026-01-07T13:36:08+5:30
अभिनेत्री दररोज 'या' सहा गोष्टींचं पालन करणार, जाणून घ्या...

नव्या वर्षात मराठी अभिनेत्रीने स्वीकारलं ७५ दिवसांचं चॅलेंज, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Sanika Kashikar Resolution 2026 : नव्या वर्षाची सुरुवात झाली की आपण सगळेच काही ना काही संकल्प करतो. पण, हे संकल्प ३१ जानेवारीपर्यंत टिकतातच असं नाही. मात्र, मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सानिका काशीकर हिने २०२६ या वर्षाची सुरुवात अत्यंत ठोस आणि शिस्तबद्ध पद्धतीने केली आहे. तिने '७५ डेज चॅलेंज' स्वीकारलं आहे.
सानिकाच्या या चॅलेंजमध्ये केवळ शारीरिक व्यायामच नाही, तर मानसिक स्वास्थ्यालाही तितकेच महत्त्व देण्यात आले आहे. सानिकाने हे आव्हान पूर्ण करण्यासाठी स्वतःसाठी सहा महत्त्वाचे नियम आखले आहेत. या चॅलेंजचा प्रत्येक दिवस तिला शिस्तीत घालवावा लागणार आहे. ७५ दिवस या सहा नियमांचे काटेकोरपणे पालन करून सानिका स्वतःला एका नवीन रूपात समोर आणण्यासाठी सज्ज झाली आहे.
६ कडक नियम
- वाचन: दररोज किमान १० पानांचे 'नॉन-फिक्शन' पुस्तक वाचने.
- भरपूर पाणी: शरीरातील हायड्रेशन राखण्यासाठी दररोज किमान ३.८ लिटर पाणी पिणे.
- कडक डाएट: केवळ डाएट फूडचे सेवन करणे.
- नो व्यसन: कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणे.
- वर्कआऊट: दररोज शारीरिक व्यायामाला महत्त्व देणे.
- मेडिटेशन: मन प्रसन्न आणि स्थिर ठेवण्यासाठी दररोज ध्यानधारणा करणे.
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
सानिकाने या चॅलेंजचा व्हिडीओ शेअर करताच मराठी चित्रपटसृष्टीतील तिचे सहकारी आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सानिकाला पाहून स्वतःचा फिटनेस प्रवास सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचं तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.