संदीप पाठक म्हणणार तुमच्यासाठी काय पन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 15:17 IST2017-11-14T09:47:22+5:302017-11-14T15:17:22+5:30

मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक दर्जेदार चित्रपट, नाटक आणि अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या कार्यक्रम आणि चित्रपटाचे ...

Sandeep Pathak will say what is happening to you | संदीप पाठक म्हणणार तुमच्यासाठी काय पन

संदीप पाठक म्हणणार तुमच्यासाठी काय पन

ाठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक दर्जेदार चित्रपट, नाटक आणि अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या कार्यक्रम आणि चित्रपटाचे निर्माते, कलाकार, दिग्दर्शक यांना आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी कलर्स मराठी एक व्यासपीठ घेऊन सज्ज आहे ज्यावर प्रसिद्धी बरोबरच मस्ती आणि मज्जा पण होणार आहे. कारण कलर्स मराठी घेऊन येत आहे एक धम्माल कार्यक्रम “तुमच्यासाठी काय पन.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगळ्यांचा लाडका संदीप पाठक करणार आहे. तसेच कार्यक्रमामध्ये योगेश शिरसाट, समीर चौगुले, अरुण कदम, भूषण कडू, हेमांगी कवी, ओंकार भोजने आणि किशोर चौघुले या विनोदवीरांची खुशखुशीत विनोदशैली, अतरंगी पात्र, खुमासदार विनोदांची मेजवानी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 
कार्यक्रमामध्ये नाविन्यता आणण्यासाठी अनेक वेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा समावेश कार्यक्रमामध्ये करण्यात आला आहे. तुमच्यासाठी काय पन मध्ये मालिका, नाटकं आणि चित्रपट यांचे प्रमोशन होणार आहे, जिथे कलाकार आपल्या कलाकृती बद्दल बोलणार आहेत, त्यांनी त्यामधून काय वेगळे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे हे सांगणार आहेत. कार्यक्रमाचा सेट स्टेशनच्या स्वरूपात बांधलेला आहे. या मनोरंजनाच्या स्टेशनवर येऊन कलाकार त्यांच्या कलाकृतीचे प्रमोशन करणार आहेत त्याचे नाव गाजावाजा स्टेशन ठेवण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमामध्ये रंगत आणण्यासाठी आणि आलेल्या कलाकारांच्या करमणुकीसाठी समीर चौगुले, योगेश शिरसाट, भूषण कडू, हेमांगी कवी, ओंकार भोजने आणि किशोर चौघुले हे विनोदवीर स्कीट देखील सादर करणार आहेत.
कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यामध्ये मराठी चित्रपट दशक्रिया आणि गेला उडत नाटकाची टीम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दशक्रिया या सिनेमाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून या कार्यक्रमाच्या मंचावर चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थितीत होती. अमितराज यांनी या सिनेमाद्वारे पहिल्यांदाच अभंगाचे संगीत दिग्दर्शन केले असून स्वप्नील बांदोडकर याने देखील अभंग पहिल्यांदाच म्हटला आहे. स्वप्नील आणि अमितराजने हा अभंग कार्यक्रमाच्या मंचावर सादर केला. तसेच “गेला उडत” नाटकाने २०० भाग पूर्ण केल्यानिमित्त संपूर्ण टीमने कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. तसेच या निमित्ताने सिद्धार्थ जाधव यांनी नाटकातील तीन नाट्यप्रवेश देखील सादर केले आणि उपस्थितांची मने जिंकली. या संपूर्ण प्रवासात नाटकाची टीम कधीच कुठेही प्रसिद्धीसाठी गेली नाही आणि पहिल्यांदाच कलर्स मराठीवरील कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली.

Also Read : कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या सेटवर सदाफुले म्हणजेच संदीप पाठक यांना मिळाले विश्रांतीचे दोन क्षण

Web Title: Sandeep Pathak will say what is happening to you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.