​संदीप पाठक सांगतोय २०१७ ठरले माझ्यासाठी खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 16:10 IST2017-12-26T10:40:19+5:302017-12-26T16:10:19+5:30

संदीप पाठकने आजवर रंगा पतंगा, पोस्टर गर्ल, नटसम्राट, डबल सीट, टाइमपास २, येड्याची जत्रा यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका ...

Sandeep Pathak is telling me, 2017 has been special for me | ​संदीप पाठक सांगतोय २०१७ ठरले माझ्यासाठी खास

​संदीप पाठक सांगतोय २०१७ ठरले माझ्यासाठी खास

दीप पाठकने आजवर रंगा पतंगा, पोस्टर गर्ल, नटसम्राट, डबल सीट, टाइमपास २, येड्याची जत्रा यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने छोट्या पडद्यावरही घडलंय बिघडलंय, फू बाई फू यांसारख्या कार्यक्रमात काम केले आहे. पण आजवर त्याने कधीच कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेले नव्हते. पण त्याला कॉमेडीची GST एक्स्प्रेस, तुमच्यासाठी काय पन या कार्यक्रमांमुळे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे २०१७ हे वर्षं त्याच्यासाठी खूप खास असल्याचे तो सांगतो. २०१७ या वर्षाविषयी तो सांगतो, २०१७ साल हे माझ्यासाठी खूपच महत्वपूर्ण ठरलं. या वर्षाच्या खूप आठवणी आहेत, खूप महत्वाच्या घटना आहेत ज्या या वर्षी घडल्या. मी असं म्हणेन २०१७ सालच्या माझ्या या वारीमध्ये माझ्या तीन महत्वाच्या इच्छा पूर्ण झाल्या. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी कधीच कुठल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले नव्हते. पण माझी ही इच्छा कलर्स मराठी या वाहिनीने पूर्ण केली. या वर्षी मला कॉमेडीची GST एक्स्प्रेस आणि सध्या सुरू असलेला आणि प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असलेला तुमच्यासाठी काय पन या दोन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी मिळाली आणि माझी बऱ्याच वर्षांपासूनची अपुरी इच्छा पूर्ण झाली. तसेच प्रत्येक मराठी माणसाचं वा महाराष्ट्रात रहाणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की, आयुष्यात एकदातरी पंढरपूरच्या वारीला जाण्याची संधी मिळावी आणि माझी ही इच्छा २०१७ साली पूर्ण झाली. ही वारी म्हणजे आठवणीतला ठेवा आहे असे मी म्हणेन. म्हणून मी म्हणेन की, २०१७ हे वर्ष माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अस ठरलं ज्यामध्ये माझी इच्छापूर्ती झाली. तसेच “वऱ्हाड निघालंय लंडनला” हे जे आमचं नाटक आहे ते महाराष्ट्रात तर प्रसिद्ध आहेच पण माझी इच्छा होती की मुंबईकरांना देखील या नाटकाचा आस्वाद घेता यावा. माझी ही इच्छा प्रशांत दामले यांच्या पाठिंब्यामुळे पूर्ण होऊ शकली. येत्या वर्षी अजून एक चांगलं नाटक करण्याची इच्छा आहे तसेच कामाबरोबर तब्येतीकडे देखील लक्ष देणार आहे.

Also Read : ​कॉमेडीची GST एक्सप्रेसच्या सेटवर सदाफुले म्हणजेच संदीप पाठक यांना मिळाले विश्रांतीचे दोन क्षण

Web Title: Sandeep Pathak is telling me, 2017 has been special for me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.