"सोनाली कुलकर्णीने कलाक्षेत्रातील तिचे माणूसपण आणि...."; समीर चौघुलेची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 10:24 AM2023-09-27T10:24:37+5:302023-09-27T10:34:04+5:30

समीर चौघुले याने भलीमोठी मोठी लिहित अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे आभार मानलेत, का ते वाचा..

Samir choughule thanked to actress sonali kulkrani for given him Charlie Chaplin statue | "सोनाली कुलकर्णीने कलाक्षेत्रातील तिचे माणूसपण आणि...."; समीर चौघुलेची 'ती' पोस्ट चर्चेत

"सोनाली कुलकर्णीने कलाक्षेत्रातील तिचे माणूसपण आणि...."; समीर चौघुलेची 'ती' पोस्ट चर्चेत

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्यांची मेजवानी मिळत असते. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना लोटपोट होऊन हसायला भाग पाडतात. या कार्यक्रमातील विनोदवीर घराघरात लोकप्रिय झाले आहेत. अभिनेता म्हणजे समीर चौघुले(samir choughule)लाही महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमुळे लोकप्रियता मिळाली. उत्तम अभिनयशैलीसह लेखन कौशल्य लाभलेला समीर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. 

त्यामुळे बऱ्याचदा समीर त्याच्या सहकलाकारांविषयीच्या पोस्ट शेअर करत असतो. समीरने एक पोस्ट शेअर केली आहे आणि यात त्याने सोनाली कुलकर्णीचे आभार मानलेत. सोनालीने समीरला  चार्ली चॅप्लिन यांची मूर्ती गिफ्ट म्हणून दिली. यानिमित्ताने समीरने आपल्या भावना व्यक्त करत एक मोठी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.  

समीरची पोस्ट
कलाक्षेत्रात एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे अत्यंत हृदयापासून खुल्या दिलाने कौतुक करणे ही गोष्ट तशी विरळच.. माझ्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत मी सहकलाकारांनी माझ्यावर केलेले निस्सीम प्रेमही अनुभवले आणि ईर्षा, जेलसी, इनसिक्युरिटी हे प्रकारसुद्धा अगदी जवळून बघितले...अनुभवले.. आपल्याला इतरांच्या यशाचा जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आपल्या यशाचा इतरांना होतो का? हा प्रश्न बरेचदा मला पडायचा...आपल्या जवळचे अनेक जण सोशल मीडियावर आपल्याबद्धल खूप वेगळे react होतात..पण प्रत्यक्षात मात्र त्यांचं खरं स्वरूप अत्यंत वेगळं असतं...पण शेवटी हे सगळ कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग म्हणून मी ग्रेसफुली स्वीकारायला ही शिकलो..असे प्रकार कदाचित फक्त आमच्या कलाक्षेत्रापुरत मर्यादित नसावेत..

या पार्श्वभूमीवर SonaliKulkarni सारखे कलाकार असतात. देवाने ज्यांच्या शरीरात काळजा ऐवजी नदीचे विशाल पात्र बसवलेले असते..सोनाली या आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबातील प्रेमळ हास्यरसिक....आज माझ्या एका प्रहसनानंतर सोनाली कुलकर्णी यांनी माझ्या देवाची म्हणजेच "सर चार्ली चॅप्लिन" यांची एक अत्यंत सुंदर मूर्ती देऊन माझा गौरव केला..ही अत्यंत सुंदर मूर्ती पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार देवधरसर यांनी घडवली आहे..(देवधरांनी घडवलेली ही चार्ली सरांची दुसरी मूर्ती माझ्या घरी आली..पहिली श्री.सुहास काळे वपु काळे यांचे सुपुत्र यांनी दिलेली स्नेहभेट होती) सोनाली यांना ही मूर्ती पेण येथील स्नेही श्री विनायक गोखले यांनी भेट दिली होती.. पण सोनाली मला म्हणाली " समीर, ज्या क्षणी ही मूर्ती माझ्या हातात आली त्या क्षणी मला तुझी आठवण आली...बरेच दिवस या मूर्तीचे वजन मला पेलवता येत नव्हते...आज ती योग्य हातात देताना मला खूप आनंद होतोय"...ही तिची वाक्य माझ्यासाठी मोठा आनंदाचा सोहळा होता..देवाने स्वर्गातून पृथ्वीवर शिंपडलेल्या पंचामृताचा थेंब होता.. सोनाली कुलकर्णी सर्वोत्तम अभिनेत्री आहेत हे सर्वांनाच माहिती आहे..पण त्यांचे हे gesture या कलाक्षेत्रातील त्यांचे माणूसपण आणि वेगळेपण ठळकपणे दर्शवत... SonaliKulkarni तुझे खूप खूप आभार...मनापासून आभार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर.....thank you Sony मराठी .....विशेष म्हणजे हा भाग जेव्हा चित्रित झाला ...त्या दिवशी बाप्पाच्या आगमनाचा दिवस होता..माझा बाप्पा साश्रू नयनांनी माझ्या घरी आला.....कायमचा..

 

 समीरच्या या पोस्टवर हास्यजत्रामधील कलाकारांसह अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. समीरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. 
 

Web Title: Samir choughule thanked to actress sonali kulkrani for given him Charlie Chaplin statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.