असा रंगणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा विकेंडचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 10:55 AM2019-03-02T10:55:01+5:302019-03-02T11:11:53+5:30

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ आगामी भागात अंतिम 16 स्पर्धकांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मोहवून टाकले आहे

Same goes for Little Champs | असा रंगणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा विकेंडचा डाव

असा रंगणार ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा विकेंडचा डाव

googlenewsNext
ठळक मुद्देकार्तिक आर्यन आणि कृती सॅनन हे या वीकेण्डच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ आगामी भागात अंतिम 16 स्पर्धकांनी सादर केलेल्या अप्रतिम गाण्यांनी प्रेक्षकांना मोहवून टाकले आहे. या कार्यक्रमात हे लहान बालस्पर्धक आपल्या बहारदार आवाजाने परीक्षक आणि ज्यूरी सदस्यांवर आपली छाप उमटवली आहे. 

‘लुका छिपी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन आणि कृती सॅनन हे या वीकेण्डच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि लाडका गायक टोनी कक्कडही उपस्थित होता. सर्वच बालगायकांनी यावेळी सुरेल गाणी सादर केली असली, तरी नागपूरच्या सुगंधा दाते या 14 वर्षांच्या बालगायिकेने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना  सुरेल आणि बहारदार स्वरांजली वाहिली. तिने श्रीदेवीजींचे ‘लम्हें’ चित्रपटातील गायलेल्या ‘मोरनी बागा मां’ या गाण्याने सर्वांना मोहित करून टाकले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सुगंधाने श्रीदेवीजींसारखेच कपडे घातले होते. आपल्या या सुरेल आदरांजलीबद्दल सुगंधाची सर्वांनी उदंड प्रशंसा केली.

आता ‘लुका छिपी’ चित्रपटातील कलाकारही या कार्यक्रमात सहभागी झाल्याने या कार्यक्रमात खूपच धमालमस्ती होणार आहे. या भागात परीक्षक आणि सूत्रसंचालक हे लोकप्रिय बॉलीवूड व्यक्तिरेखेच्या रूपात भेटणार असल्याने ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या मंचावर बॉलीवूडचा प्रभाव वाढल्याचं दिसेल. कारण अमाल मनलिकने ‘सिम्बा’तील पोलिस निरीक्षकाचा गणवेश घातलेला दिसेल; तर दुसरी परीक्षक रिचा शर्मा ही झीनत अमानाच्या रूपात दिसेल. ‘शानटॅस्टिक’ परीक्षक शान हा शाहरूख खानच्या भूमिकेत असेल तर सूत्रसंचालक रवी दुबे हा ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ चित्रपटातील एका विद्यार्थ्याच्या वेशभूषेत असेल.  एकंदरीतच येत्या वीकेण्डचा कार्यक्रम हा प्रेक्षकांसाठी अगदी फिल्मी आणि धमाल मनोरंजक असेल.
 

Web Title: Same goes for Little Champs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.