समता सागर म्हणते दोन अभिनेत्री कधीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 10:03 IST2018-03-21T04:33:21+5:302018-03-21T10:03:27+5:30

नवीन मालिका 'हर शांख पे ऊल्लू बैठा है' ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असून इंडस्ट्रीमध्ये ह्या मालिकेने आपले असे वलय ...

Samata Sagar says two actresses can never be good friends? | समता सागर म्हणते दोन अभिनेत्री कधीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही?

समता सागर म्हणते दोन अभिनेत्री कधीच चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही?

ीन मालिका 'हर शांख पे ऊल्लू बैठा है' ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असून इंडस्ट्रीमध्ये ह्या मालिकेने आपले असे वलय निर्माण केले आहे. अभिनेत्री समता सागर यात ईमली देवी (सीएम चैतू लालची बायको) ची भूमिका करत असून तिची आणि तिची सहकलाकार मेलिसा पैस ऊर्फ मलाई चैतू लालची वहिनी यांची छान गट्टी जमली आहे.ती म्हणते, “माझी आणि मेलिसाची छान मैत्री झाली आहे. दोन अभिनेत्री मैत्रिणी असू शकत नाहीत असं कोण म्हणतं? अगदी पहिल्या दिवसापासून आमची मस्त गट्टी झाली आणि आम्ही एकमेकींना अभिनय आणि मेकअप टिप्स देतो. एक अभिनेत्री म्हणून मला ती आवडते आणि मला छान वाटतंय की ह्या शोमुळे आम्ही एकत्र आलो. माझ्या आयुष्यातील चढउतारांच्या वेळेस मी सल्ला घ्यायला तिच्याकडेच जाते. आशा करते की मैत्री अशीच उत्तरोत्तर वाढत जाईल.समताची ह्या शोमधील अन्य सहकलाकारांसोबतही चांगले संबंध आहेत. मेलिसा तर तिची खास दोस्त आहे.आणि आशा आहे की ऑनस्क्रीन बहिणी असलेल्या ह्या दोघी ऑफस्क्रीनही छान मैत्रिणीच राहतील.

टीव्हीवरील राजकीय विडंबनाची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत वाढली असून त्यामुळे आपल्याच चुकांवर हसण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे.‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ही मालिका देशातील विद्यमान राजकीय स्थितीवर तिरकस भाष्य सादर करणारी कॉमेडी मालिका आहे.राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’या कार्यक्रमातील एक लोकप्रिय उमेदवार राजीव निगम हे या मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट आणि विनोदी राजकीय नेत्याची भूमिका रंगवत आहे.राजीव निगम म्हणाले,“एक नेता म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा मी नेहमीच आदर करतो. राजकीय उपहास हे माझं कार्यक्षेत्र असल्याने मला वाजपेयी यांच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. मी त्यांची भाषणं नेहमीच ऐकत आलो असून त्यांची नक्कल करण्याचाही प्रयत्न केला आहे.त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द प्रशंसनीय असून त्यांनी भारताला स्वसंरक्षणार्थ अण्वस्त्र बाळगण्याचं समर्थन केलं होतं.तसंच आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी अनेक सुधारणा केल्या.आश्वासनं देऊन आपल्या कार्यकाळातच ती प्रत्यक्षात उतरविणार्‍या मोजक्या नेत्यांमध्ये वाजपेयी यांचा समावेश होतो.”प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यावर राजीव निगम यांचा भर असून त्यासाठी राजकीय उपहास हे माध्यम त्यांनी निवडले आहे.या भ्रष्ट नेत्यांच्या दृष्टीने आपले खिसे भरणं हे सर्वात प्राधान्याचं काम असून देशाचं हित हे सर्वात शेवटी येतं.आपल्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नसल्याचे राजीव निगमने सांगितले.

Web Title: Samata Sagar says two actresses can never be good friends?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.