'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:24 IST2025-08-25T11:23:55+5:302025-08-25T11:24:27+5:30

बिग बॉस १९ चा प्रीमियर काल दणक्यात पार पडला. सलमानने पुन्हा होस्ट म्हणून सर्वांचं मन जिंकलं, पण...

salman khan will host bigg boss 19 for 15 weeks only took fees less than former season | 'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा

'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा

बहुप्रतिक्षित बिग बॉस १९ (Bigg Boss 19) चा प्रीमियर काल झाला. सलमान खान (Salman Khan) होस्टच्या भूमिकेत परत आला. १६ स्पर्धकांनी काल बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. आजपासून घरातील स्पर्धकांमध्ये भांडणं, मजामस्ती पाहायला मिळणार आहे. यंदा बिग बॉसमध्ये राजकारणाची थीम आहे. तसंच सगळेच सूत्र सदस्यांच्या हातात असणार आहेत. त्यात सलमान खान नेहमीप्रमाणेच सदस्यांची शाळा घेणार आहे. मात्र शोच्या चाहते एका कारणामुळे निराश होऊ शकतात. ते म्हणजे सलमान खान फक्त १५ आठवडेच शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे. नंतर त्याची जागा करण जोहर आणि फराह खान घेणार आहेत अशी चर्चा आहे.

सलमान खान आणि बिग बॉस हे समीकरणच आहे. प्रत्येक वर्षी त्याने आपल्या होस्टिंग स्टाईलने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तसंच तो टीव्हीवरील सर्वात जास्त कमाई करणारा सेलिब्रिटी आहे. त्याने प्रत्येक सीझनमध्ये २०० कोटींपेक्षा जास्त कमावले आहेत. बिग बॉस १९ च्या प्रत्येक वीकेंड साठी तब्बल १० कोटी रुपये घेत आहे. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, या सीझनमध्ये त्याच्या कमाईत घट होणार आहे. कारण सलमान १५ आठवड्यांसाठीच शोमध्ये दिसणार आहे. तर हा शो २० ते २२ आठवडे चालणार आहे. त्यामुळे राहिलेले एपिसोड्ससाठी फराह खान आणि करण जोहर येतील अशी चर्चचा आहे. सलमानने १५ आठवड्यांसाठी १५० कोटी रुपये घेतले आहेत. याचाच अर्थ प्रत्येक आठवज्यासाठी त्याने २१ कोटी चार्ज केले आहेत.

बिग बॉस १८ साठी सलमानने २५० कोटी चार्ज केले होके. बिग बॉस १७ साली २०० कोटी घेतले होते. आता या सीझनला सलमान तीनच महिने दिसणार असल्याने चाहते थोडे निराश झाले आहेत. कारण प्रत्येक आठवड्याला सलमानच्या वीकेंड का वारची चाहत्यांना प्रतिक्षा असते.

सलमान खान सध्या 'बॅटल ऑफ गलवान'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याचं लडाखमध्ये शेड्युल सुरु आहे. सलमान खानचा सेटवरुन पहिला फोटोही समोर आला होता. मागील काही सिनेमे आपटल्यानंतर आता या सिनेमाकडून सलमानला आणि त्याच्या चाहत्यांनाही अपेक्षा आहे. 

Web Title: salman khan will host bigg boss 19 for 15 weeks only took fees less than former season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.