सलमान खान बिग बॉसला करणार अलविदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 11:53 IST2017-04-28T06:23:06+5:302017-04-28T11:53:06+5:30

बिग बॉस आणि सलमान खान हे जणू एक समीकरणच बनले आहे. या मालिकेच्या सुरुवातीच्या काही सिझनचे अमिताभ बच्चन, अर्शद ...

Salman Khan Bye Bye Big Boss? | सलमान खान बिग बॉसला करणार अलविदा?

सलमान खान बिग बॉसला करणार अलविदा?

ग बॉस आणि सलमान खान हे जणू एक समीकरणच बनले आहे. या मालिकेच्या सुरुवातीच्या काही सिझनचे अमिताभ बच्चन, अर्शद वारसी, शिल्पा शेट्टी यांनी सूत्रसंचालन केले होते. पण गेल्या काही सिझनपासून सलमान या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असून त्याच्यामुळे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची सलमानची स्टाइल सगळ्यांनाच खूप आवडते. 
सलमान खानने दस का दम या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर आगमन केले. या कार्यक्रमाच्या त्याच्या सूत्रसंचालनाचेदेखील कौतुक झाले होते. या कार्यक्रमानंतर सलमानला बिग बॉस या कार्यक्रमाची ऑफर आली आणि त्याने ती स्वीकारली. सलमानने मोठ्या पडद्यावर त्याचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. त्याचसोबत आता तो छोट्या पडद्यावरदेखील चांगलाच सेट झाला आहे. 
दस का दम या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेऊन कित्येक वर्षं झाली आहेत. पण आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून याचे सूत्रसंचालनदेखील सलमानच करणार असल्याचे म्हटले जात आहे. सोनी या वाहिनीने सलमानला या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनसाठी विचारले असून सलमान यासाठी तयारदेखील झालेला असल्याची चर्चा आहे. बिग बॉस आणि त्या कार्यक्रमामुळे निर्माण होणारे वादविवाद यांना कंटाळल्यामुळेच त्याने बिग बॉस न करता दस का दम करण्याचे ठरवले असल्याचेदेखील म्हटले जात आहे तर दुसरीकडे द कपिल शर्मा शोचा टिआरपी ढासळत असल्याने वाहिनीला एखाद्या चांगल्या कार्यक्रमाची गरज असल्याने दस का दम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सोनी वाहिनी प्रयत्न करत आहे. 
सलमानने दस का दम हा कार्यक्रम स्वीकारल्यानंतर तो बिग बॉसदेखील करणार की या कार्यक्रमाला रामराम ठोकणार हे प्रेक्षकांना काहीच दिवसांत कळेल. 

Web Title: Salman Khan Bye Bye Big Boss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.