Bigg Boss 16: शोमधून बाहेर होणार नाही Sajid Khan? लैंगिक छळाच्या आरोपावरून होतोय विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 14:31 IST2022-10-15T14:27:04+5:302022-10-15T14:31:35+5:30
महिला कलाकारांना नग्न फोटो पाठवण्यास सांगणे, महिला अभिनेत्रींसमोर पॉर्न पाहणे, पार्ट्यांमध्ये त्यांना प्रायव्हेट पार्ट दाखवणे असे गंभीर आरोप साजिद खानवर आहेत.

Bigg Boss 16: शोमधून बाहेर होणार नाही Sajid Khan? लैंगिक छळाच्या आरोपावरून होतोय विरोध
चित्रपट निर्माता साजिद खान (Sajid Khan)ने जेव्हापासून बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून रिअॅलिटी शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात साजिद खानवरील लावण्यात आलेले गंभीर आरोप पाहता त्याला बाहेरचा दरवाजा दाखवला जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या, पण आता नवीन रिपोर्ट्स काही वेगळेच सांगत आहेत. या रिपोर्ट्सनुसार, साजिद खान घरीच राहणार आहे.
मंदाना करीमी(Mandana Karim), आहाना कुमरा(Aahana Kumra), कनिष्क सोनी(Kanishka Soni) आणि शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra)यांच्यासह अनेकांनी साजिदवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यामध्ये कास्टिंगचा भाग म्हणून महिला कलाकारांना नग्न फोटो पाठवण्यास सांगणे, महिला अभिनेत्रींसमोर पॉर्न पाहणे, पार्ट्यांमध्ये त्यांना प्रायव्हेट पार्ट दाखवणे, महिलांशी अश्लील रीतीने बोलणे असे अनेक गंभीर आरोप आहेत.
साजिद बिग बॉसच्या घरात गेल्यापासून त्याची जुनी प्रकरणं पुन्हा बाहेर येऊ लागली. यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही. सर्वसामान्यांपासून ते अनेक बड्या व्यक्तींकडून साजिदला शोमधून बाहेर काढण्याची मागणी होत होती. प्रेक्षकांनी साजिद खान आणि शोच्या निर्मात्यांची जोरदार टीका केली होती.
दरम्यान चित्रपट निर्मात्याच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या विरोधपाहून शोच्या निर्मात्यांनी साजिदला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले होते. तथापि, Koimoi.com च्या अहवालानुसार, या केवळ अफवा आहेत. साजिद खान शोमध्येच आहे आणि बिग बॉसमधील खेळाच्या नियमानुसार तो बाहेर पडेल.