'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 20:20 IST2025-11-25T20:20:00+5:302025-11-25T20:20:20+5:30
Komal Kumbhar Wedding: 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत अंजीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कोमल कुंभारने आज गोकुळ दशवंतसोबत लग्नबेडीत अडकली आहे. त्यांचा विवाहसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला. नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहेत. नुकतेच रंग माझा वेगळा फेम मेघन जाधव आणि अनुष्का पिंपुटकर यांनी लग्नगाठ बांधली. तसेच येत्या २९ नोव्हेंबर बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणदेखील बोहल्यावर चढणार आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडदेखील लवकरच लग्न करणार आहे. दरम्यान आता 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत अंजीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कोमल कुंभारने आज गोकुळ दशवंतसोबत लग्नबेडीत अडकली आहे. त्यांचा विवाहसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडला. नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
कोमल कुंभार आणि गोकुळ दशवंत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर आता ते विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नात कोमलने पोपटी रंगाची साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, नाकात नथ अशा वधूच्या गेटअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तर गोकुळने तिला मॅचिंग होईल असा पोपटी रंगाचा फेटा आणि शेला घेतला होता. तर रिसेप्शनसाठी कोमलने गोल्डन रंगाची हेवी वर्क असलेली साडी नेसली होती. तर गोकुळने ऑफव्हाइट रंगाची शेरवानी, फेटा आणि शेला घातला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या या फोटो आणि व्हिडीओवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
गोकुळ दशवंतदेखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. तो अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक आहे. तर कोमल कुंभारने 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेव्यतिरिक्त अबोली या मालिकेत काम केले आहे. तिने यात मनवाची भूमिका साकारली होती.