पश्याच्या लग्नाला पूर्ण झाले ४ महिने; पत्नीने शेअर केला लग्नातील रोमॅण्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 18:14 IST2023-07-17T18:13:32+5:302023-07-17T18:14:12+5:30
Akash-nalawde: आकाशने रुचिका धुरी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. रुचिका कलाविश्वात सक्रीय नसली तरीदेखील ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे.

पश्याच्या लग्नाला पूर्ण झाले ४ महिने; पत्नीने शेअर केला लग्नातील रोमॅण्टिक फोटो
छोट्या पडद्यावर विशेष गाजलेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahakutumb sahaparivar). या मालिकेतील अनेक कलाकार सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. त्यातला एक अभिनेता म्हणजे आकाश नलावडे (Akash Nalawade). या मालिकेत पश्याची भूमिका साकारुन आकाश प्रकाशझोतात आला. काही महिन्यांपूर्वीच आकाशने लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाला नुकतेच चार महिने झाले असून त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आकाशने रुचिका धुरी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. रुचिका कलाविश्वात सक्रीय नसली तरीदेखील ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे. ती बऱ्याचदा आकाशसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
आकाशच्या लग्नाला चार महिना पूर्ण झाला असून त्याची पत्नी रुचिका हिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या रिसेप्शन पार्टीमधील आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये ही जोडी रोमॅण्टिक झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, आकाशच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर आजही या लग्नाची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होते. या लग्नसोहळ्याला सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील संपूर्ण मोरे कुटुंबाने हजेरी लावली होती.