​सचिन पिळगांवकर सरगममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 13:18 IST2017-04-18T07:48:57+5:302017-04-18T13:18:57+5:30

सचिन पिळगांवकर हे एक उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते असण्यासोबतच खूप चांगले गायक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांत गाणी गायली असून ...

Sachin Pilgaonkar in Sargam | ​सचिन पिळगांवकर सरगममध्ये

​सचिन पिळगांवकर सरगममध्ये

िन पिळगांवकर हे एक उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते असण्यासोबतच खूप चांगले गायक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांत गाणी गायली असून त्यातील अनेक गाणी हिट झाली आहेत. त्यांची गाजलेली जुनी सदाबहार गीते प्रेक्षकांना सरगममध्ये ऐकायला मिळणार आहेत. सरगमचा हा किड्स स्पेशल एपिसोड असून तो प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे.
सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयातून केवळ मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील आपला एका वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांसोबतच मालिकांमध्येदेखील काम केले आहे. तसेच अनेक मालिकांचे दिग्दर्शनदेखील केले आहे.  
सरगमच्या किड्स स्पेशल एपिसोडमध्ये लहान मुलांबरोबर त्यांच्यात एक होऊन सचिन पिळगांवकर गाताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सचिन पिळगांवकर यांची आजपर्यंत गाजलेली अनेक गाणी ते प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत.
प्यार हमे इस मोड पे ले आया, बडे अच्छे लगते है, लागा चुनरी मैं दाग, अशी ही बनवाबनवी, माझा मार्ग वेगळा या गाण्यांचा यात समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे अनेक टॅलेंटेड लहान मुले सचिन पिळगांवकर यांना या कार्यक्रमात साथ देणार आहेत. 
सरगम या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला कोठारे करत असून आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे तर सिद्धार्थ आणि सौमिल यांनी ते संगीतबद्ध केले आहे. 

Web Title: Sachin Pilgaonkar in Sargam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.