स्वत:च्याच रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्रीने सेलिब्रेट केला वडिलांचा ७०वा वाढदिवस, दिलं खास सरप्राइज
By कोमल खांबे | Updated: October 14, 2025 18:02 IST2025-10-14T18:00:59+5:302025-10-14T18:02:07+5:30
मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेदेखील काही दिवसांपूर्वीच स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं. ऋतुजाने 'फुडचं पाऊल' नावाने रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्रीने तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला.

स्वत:च्याच रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्रीने सेलिब्रेट केला वडिलांचा ७०वा वाढदिवस, दिलं खास सरप्राइज
सिनेइंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या अभिनयाव्यतिरिक्त एक बिजनेस वुमनही आहेत. काही अभिनेत्रींनी हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवत स्वत:चे रेस्टॉरंट सुरू केले आहेत. मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनेदेखील काही दिवसांपूर्वीच स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलं. ऋतुजाने 'फुडचं पाऊल' नावाने रेस्टॉरंट सुरू केलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्रीने तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला.
ऋतुजा बागवेच्या वडिलांचा ७०वा वाढदिवस नुकताच झाला. अभिनेत्रीने वडिलांच्या ७०व्या वाढदिवशी तिच्या रेस्टॉरंटमध्येच वडिलांना खास सरप्राइज दिलं. ऋतुजाने वडिलांच्या बर्थडेनिमित्त रेस्टॉरंटमध्ये खास डेकोरेशन केलं होतं. ७० दिव्यांनी त्यांचं औक्षण केलं. वाढदिवस सेलिब्रेशनचे काही खास क्षण अभिनेत्रीने व्हिडीओतून शेअर केले आहेत.
ऋतुजा हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्येही तिने काम केलं आहे. एक उत्तम अभिनेत्री असलेल्या ऋतुजाला सुरुवातीला इंडस्ट्रीत वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. पण, अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर अपार मेहनत करत तिने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. ऋतुजा हिंदी मालिकेतही झळकली आहे.