बादशाह म्हणतो, रशियन करिना एक गुणी गायिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:32 IST2018-07-16T14:28:20+5:302018-07-16T14:32:18+5:30

या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.

 Russian kareena is a quality singer | बादशाह म्हणतो, रशियन करिना एक गुणी गायिका

बादशाह म्हणतो, रशियन करिना एक गुणी गायिका

‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सीमा पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.


 ‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताचा उत्सव साजरा करतानाच भारताचा सन्मान वाढविणारा कार्यक्रम असून त्यात सुनिधी चौहान, प्रीतम आणि बादशहा यांच्यासारखे संगीत क्षेत्रातील दिग्गज परीक्षक म्हणून काम बघत आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेली रशियन स्पर्धक करिना शोमाखोवा हिने एक अप्रतिम गाणे सादर करून सर्वच परीक्षकांना थक्क केले. तिचे हिंदी उच्चार अस्खलित होते, ते पाहून सर्वच चकित झाले. बादशहा म्हणाला, “या कार्यक्रमातील आंतरराष्ट्रीय स्पर्धकांमध्ये करिना ही एक अतिशय गुणी स्पर्धक आहे. तिला बॉलीवूडच्या गाण्यांची प्रचंड आवड असून तिचे अस्खलित आणि शुध्द हिंदी उच्चार आम्हाला चकित करून गेले. दरवेळी तिचं गाणं ऐकून आम्ही अवाक होतो. ती एक उत्कृष्ट कलाकार असून ती आली की हा मंच उत्साहाने भरुन जातो. तिचा जाहीर कार्यक्रम ऐकायला मला नक्कीच आवडेल. ती खऱ्या अर्थाने दिल है हिंदुस्तानी आहे.”
 

Web Title:  Russian kareena is a quality singer