अमोल साकारणार योध्दाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 07:06 IST2016-03-18T13:53:07+5:302016-03-18T07:06:22+5:30
रमा माधव, निळकंठ मास्तर यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा आपल्या मराठी इंडस्ट्रीला लाभली आहे.असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला ...

अमोल साकारणार योध्दाची भूमिका
मा माधव, निळकंठ मास्तर यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा आपल्या मराठी इंडस्ट्रीला लाभली आहे.असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.कृष्णाजी-एक योद्धा या योध्दाचा प्रवास रूपरी पडदयावर उलगडणार आहे. या चित्रपटात कृष्णाजी या महान व कर्तृत्ववान व्यक्तिरेखेचं शिवधनुष्य अभिनेता डॉ अमोल कोल्हे यांनी पेललं आहे. तसेच हा चित्रपट अनंत सामंत यांच्या लिलियनची बखर या कादंबरीवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत गिलाटर करणार आहेत. इंग्रज व मराठे यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
![]()