ही भूमिका एक आव्हान म्हणून स्वीकारली- कुशल पंजाबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:32 IST2017-10-03T13:02:13+5:302017-10-03T18:32:13+5:30
कुशल पंजाबी हा अनुभवी अभिनेता टीव्ही मालिकांमध्ये पुनरागमन करीत असून तो भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. वास्तविक त्याला पौराणिक ...

ही भूमिका एक आव्हान म्हणून स्वीकारली- कुशल पंजाबी
क शल पंजाबी हा अनुभवी अभिनेता टीव्ही मालिकांमध्ये पुनरागमन करीत असून तो भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. वास्तविक त्याला पौराणिक व्यक्तिरेखेची भूमिका साकारावयाची नव्हती; परंतु या भूमिकेला असलेली विनोदाची डूब बघितल्यावर त्याने ती स्वीकारली. कुशल सांगतो, “ही भूमिका स्वीकारावी की नाही, याबाबत मी संभ्रमात असतानाच निर्माता विपुल डी. शहा याने मला पायलट भागाच्या चित्रीकरणासाठी फोन केला. तेव्हा एक आव्हान आणि नव्या क्षेत्रातील भूमिका रंगविण्याची संधी म्हणून मी ही भूमिका स्वीकारली. माझ्या भूमिकेला एक चांगली मानवी बाजूही आहे. तो चांगला, गोड असून तो मिस्किलही आहे.” टीव्हीवर आजवर शंकराची भूमिका ही धीरगंभीर स्वरूपातच सादर करण्यात आली आहे. पण आता या भूमिकेला विनोदाची डूब दिल्यामुळे श्रध्दाळूंच्या भावना दुखावल्या जाण्याची भीती त्याला वाटत नाही का? “शंकराची व्यक्तिरेखा विनोदी नाहीये, त्याच्या अवतीभोवती जी पात्रं आहेत, ती विनोदनिर्मिती करीत असतात. त्यावरील शिवजींची प्रतिक्रिया मजेदार असून त्यामुळे प्रेक्षकांच्या चेहर््यावर नक्कीच स्मितरेषा उमटतील- त्यात कोणतीही नकारात्मक किंवा उपहासात्मक भावना नाही. लोकांना हे शिवजी नक्कीच आवडतील- तो जरी सर्वशक्तिमान ईश्वर असला, तरी त्याचा भोळेपणा आणि स्वत्वाची भावना त्याला अधिक मवाळ करते,” असे कुशल सांगतो. आपल्या मुलाच्या पत्नीत पाच विशेष गुण असावेत, अशी इच्छा बाळगणार््या आईला पाच सुना मिळतात आणि त्यामुळे उदभविणार््या पेचप्रसंगांचे चित्रण ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत विनोदी पध्दतीने केले आहे. आपल्या अतिआग्रही स्वभावामुळे सासूला कसे अनेक त्रास सोसावे लागतात, हे दर्शविणारी ही मालिका आहे. कधी कधी गरजेपेक्षा अधिक गोष्टींची मागणी ही संकटांना निमंत्रण देते, हे या मालिकेत हलक्याफुलक्या पध्दतीने दाखविले आहे. आपली सून अगदी परिपूर्ण आणि निर्दोष असावी, याची हाव धरणे अयोग्य असून आपल्या सुनांकडून सासवांनी अवाजवी अपेक्षा करू नयेत, असा संदेश ही मालिका देते.या मालिकेची निर्मिती विपुल डी शाह यांनी केली असून या मालिकेत कांचन गुप्ता आणि मनिंदर सिंग यांची मुख्य भूमिका आहे.