'मायावी मलिंग'मध्ये हर्षद अरोरा साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 14:46 IST2018-04-06T07:59:38+5:302018-04-06T14:46:14+5:30
'देहलिज','बेइन्तिहा',‘खूँखार : सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स’ यांसारख्या मालिकांमध्ये हर्षद अरोराच्या भूमिका रसिकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या होत्या.प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने मोहिनी टाकणारा ...
.jpg)
'मायावी मलिंग'मध्ये हर्षद अरोरा साकारणार ही भूमिका
' ;देहलिज','बेइन्तिहा',‘खूँखार : सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स’ यांसारख्या मालिकांमध्ये हर्षद अरोराच्या भूमिका रसिकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या होत्या.प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने मोहिनी टाकणारा अभिनेता हर्षद अरोरा आता वेगळ्याच भूमिकेच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.अनेक वर्षे सकारात्मक भूमिका केल्यानंतर आता अखेर हर्षद अरोरा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.नवीन फँटसी फिक्शन 'मायावी मलिंग'मध्ये तो खलनायकाची भूमिका साकरणार आहे.आपल्या आपल्या नवीन शो मायावी मलिंगबद्दल हर्षदने सांगितले की, हा शो प्रेक्षकांना तीन राजकुमाऱ्या आणि आपले राज्य वाचवण्यासाठी त्यांचा लढा यांसोबत फँटसीच्या दुनियेत घेऊन जाईल.प्रणाली, ऐश्वर्या आणि गरिमा ह्या तीन राजकुमाऱ्यांचा प्रवास असलेल्या ह्या शोमधून आपल्या आत दडलेल्या हीरोला बाहेर काढण्याची क्षमता दिसून येते.प्रणाली, ईश्वर्या आणि गरिमा या तीन राजकन्यांच्या भूमिका अनुक्रमे नेहा सोळंकी,वाणी सूद आणि ग्रेसी गोस्वामी या अभिनेत्री साकारणार असून हर्षद अरोरा आणि शक्ती आनंद हे अभिनेते महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. विवेक बहेल आणि ‘पेनिन्सुला पिक्चर’ यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील विशेष व्हीएफएक्स ‘प्राण स्टुडिओज’ ही जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी पुरविणार आहे.या स्पेशल इफेक्टमुळे प्रेक्षकांना अफलातून दृष्ये पाहायला मिळतील. काळभैरव मालिका आता एप्रिल महिन्यात रसिकांचा निरोप घेत आहे. याच मालिकेच्या वेळेत ‘मायावी मलिंग’ ही नवी कोरी मालिका प्रसारित केली जाणार आहे.मध्यंतरी हर्षद अरोरा त्याच्या करिअरमुळे नाहीतर एका वेगळ्याच कारणामुळे जास्त चर्चेत होता.टीव्ही असो किंवा मालिका कालकारांमध्ये वादविवाद रंगल्याच्या अनेक बातम्या येत असतात त्यावेळी हर्षद अरोरा आणि अंकित राज दोघेही ‘खूँखार : सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स’ मालिकेत एकत्र काम करत होते. आणि काही कारणामुळेच दोघांमध्ये बिसल्याच्या चर्चा होत्या.मालिकेतील भूमिकेला हर्षदपेक्षा अंकितला अधिक पसंती मिळाल्यामुळे हर्षद संतापला असल्याच्या अफवा उठल्या होत्या.त्यामुळे हर्षदला आपल्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखं वाटलं.तेव्हा तो तात्काळ तिथून निघून गेला आणि त्यादिवशी त्याने कोणाचेही कॉलही रिसीव्ह केले नव्हते.” याविषयी हर्षदकडे विचारणा केल्यावर त्याने सांगितले होते की, “पहिली गोष्ट म्हणजे अंकित आणि मी एकत्र चित्रीकरण करीत नाही.त्यामुळे आम्ही एकमेकांशी स्पर्धा करण्याचा किंवा वरचढपणा दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.त्यादिवशी मी लवकर निघून गेलो कारण मला विमानतळावर एका मित्राला घ्यायला जायचं होतं. या घटनेतून प्रेक्षकांनी फार अर्थ काढू नये असेही म्हटले होते.