​मोनाली ठाकूर रायजिंग स्टारमध्ये साकारणार परीक्षकाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 10:29 IST2017-12-28T04:59:22+5:302017-12-28T10:29:22+5:30

नाविन्यपूर्ण आणि कल्पक विषय देण्यासाठी वचनबद्ध असलेली कलर्स वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन केंद्रभागी ठेवून भारताचा पहिला लाइव्ह रिअॅलिटी शो पुन्हा ...

Role of the examiner to play in Monali Thakur Raising Star | ​मोनाली ठाकूर रायजिंग स्टारमध्ये साकारणार परीक्षकाची भूमिका

​मोनाली ठाकूर रायजिंग स्टारमध्ये साकारणार परीक्षकाची भूमिका

विन्यपूर्ण आणि कल्पक विषय देण्यासाठी वचनबद्ध असलेली कलर्स वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन केंद्रभागी ठेवून भारताचा पहिला लाइव्ह रिअॅलिटी शो पुन्हा घेऊन येत आहे. या शोच्या दुसऱ्या आवृत्ती मध्ये जगभरातील हजारो महत्त्वाकांक्षी गायक त्यांचा संगीतमय पराक्रम सर्वात मोठ्या मंचावर दाखविण्यासाठी सज्ज झाले आहेत. या कार्यक्रमासाठी ऑडिशन देखील सुरू झाली असल्याचे म्हटले जात आहे.  
राष्ट्रीय पारितोषिक विजेती मोनाली ठाकूर कलर्सच्या रायझिंग स्टारच्या दुसऱ्या आवृत्तीतही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निष्णात संगीतकार-गायक शंकर महादेवन आणि गायिका मोनाली ठाकूर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहेत. या दोघांनी गेल्या वर्षी देखील या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती. दुसऱ्या सिझनमध्ये पुन्हा परीक्षकाची भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याने मोनाली सध्या चांगलीच खूश आहे. याविषयी मोनाली ठाकूर सांगते, “रायझिंग स्टारचा या आधीचा सिझन खूपच चांगला होता. गेल्या सिझनमध्ये अनेक चांगल्या गायकांनी आपल्या गायनाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या कार्यक्रमाचा अनुभव खूपच चांगला होता. या शोवर परत येण्यासाठी आणि उत्कृष्ट टायलेंट लोकांसमोर आणण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.”
रायजिंग स्टार या कार्यक्रमाच्या फॉरमॅटनुसार हा कार्यक्रम पाहात असतानाच प्रेक्षक लाईव्ह वोटिंग करत करतात. ऑडियन्सना जर एखाद्याचा परफॉर्मन्स आवडला तो स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पात्र ठरतो. त्यामुळे हा पहिला शो आहे ज्यात जज चॉईसनुसार नाही तर रसिकांच्या चॉईसनुसार स्पर्धक निवडले जातात. शंकर महादेवन, दिलजित दोसांझ आणि मोनाली ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे परीक्षण केले होते. यंदाच्या सिझनमध्ये देखील शंकर आणि मोनाली परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या दोघांसोबत तिसरा परीक्षक कोण असणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे.
ऑप्टिमिस्टीक एंटरटेनमेंट द्वारा निर्मित रायझिंग स्टारचे यंदाचे पर्व अधिक रंजक व्हावे यासाठी सध्या कार्यक्रमाची टीम प्रयत्न करत आहे. या सिझनमध्ये देखील खूप चांगले स्पर्धक पाहायला मिळतील अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : दिलजीत दोसांजने गायले सैराटमधील झिगांट गाणे

Web Title: Role of the examiner to play in Monali Thakur Raising Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.