इस प्यार को क्या नाम दूँ मध्ये बरुण सोबती साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 11:15 IST2017-07-04T05:45:36+5:302017-07-04T11:15:36+5:30

इस प्यार को क्या नाम दूँ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील अर्णव सिंग रायजादा ही बरुण सोबतीने ...

The role of Barun Sobti in the name of this love | इस प्यार को क्या नाम दूँ मध्ये बरुण सोबती साकारणार ही भूमिका

इस प्यार को क्या नाम दूँ मध्ये बरुण सोबती साकारणार ही भूमिका

प्यार को क्या नाम दूँ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील अर्णव सिंग रायजादा ही बरुण सोबतीने साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती. आज ही मालिका संपून पाच वर्षं झाले असले तरी ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. 
इस प्यार को क्या नाम दूँ ही मालिका केवळ भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, तुर्की, इजिप्त यांसारख्या देशातही प्रसिद्ध होती. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगातील विविध देशात बरुणचे चाहते आहेत.
बरुणने इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेनंतर छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता. या दरम्यान त्याने काही चित्रपटात आणि वेबसिरिजमध्ये काम केले. आता बरुण इस प्यार को क्या नाम दूँ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिझन आतापर्यंतच्या सगळ्या सिझनमध्ये वेगळा असणार आहे. यात प्रेक्षकांना एक सूडकथा पाहायला मिळणार आहे. एखाद्या मसाला चित्रपटाप्रमाणे या मालिकेची कथा असणार आहे. 
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेच्या तिसऱ्या सिझनमध्ये बरुण सोबती अद्वय रायजादा या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेतील त्याची व्यक्तिरेखा काहीशी अर्णब रायजादा सारखीच असणार आहे. अर्णब हा सगळ्या गोष्टी सहन करणारा असा होता. त्याचे शत्रू कोण आहेत याची त्याला कधीच कल्पना नसायची. पण अद्वय हा सगळे काही जाणणारा आणि आपल्या शत्रूला सडेतोड उत्तर देणारा असा आहे. 
बरुण गेल्या पाच वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर असला तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत काहीच फरक पडलेला नाही. आजही तो छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. 
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत बरुण सोबतीची सान्या इराणीसोबत जोडी जमली होती. या मालिकेच्या तिसऱ्या सिझनमध्ये शिवानी तोमर त्याची नायिका असणार आहे. 

Also Read : ​सान्या इराणी आणि बरुण सोबतीची जोडी पुन्हा जमणार?

Web Title: The role of Barun Sobti in the name of this love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.