'हा' रोडिज स्पर्धक दिसणार मराठी बिग बॉसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 17:21 IST2018-04-02T08:13:42+5:302018-04-02T17:21:25+5:30
बिग बॉस हा कर्लस चॅनवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो पैकी एक आहे. आतापर्यंत तब्बल बिग बॉसचे 11सीझन येऊन गेले ...
.jpg)
'हा' रोडिज स्पर्धक दिसणार मराठी बिग बॉसमध्ये
ब ग बॉस हा कर्लस चॅनवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो पैकी एक आहे. आतापर्यंत तब्बल बिग बॉसचे 11सीझन येऊन गेले आहेत. या शोला सलमान खानच्या सूत्रसंचालनाने एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. नुकताच झालेल्या बिग बॉसच्या सीझनची विजेती मराठमोळी शिल्पा शिंदे ठरली होती. हा कार्यक्रम काही दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील बनवण्यात आला आहे. आता हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांप्रमाणेच हा कार्यक्रम प्रेक्षकांना मराठीत देखील पाहायला मिळणार असून नुकतीच या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाचे प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली आहे.
बिग बॉस चाहते है ! हे वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा त्या घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांचंही लक्ष त्या आवाजाच्या दिशेनं वळतं आणि आता काय घडणार याची उत्सुकता लागते. हे सर्व आता आपल्या मायबोलीत मराठीत घडणार आहे. बिग बॉस नेमक्या काय सूचना देईल त्यासाठी काय खास वाक्य असतील, त्याचा आवाज कसा असेल याबद्दल प्रेक्षकांच्या मनात आतापासूनच प्रश्न तयार झाले आहेत. या आवाजासोबतच घरातील सदस्यांशी बाहेरून संवाद साधणारी एकमेव व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्रधार. या सदस्यांना कधी प्रेमाने समजावणे तर कधी आपला धाकही निर्माण करण्याचं काम सूत्रधार शनिवार रविवारच्या भागात करत असतो. ही भूमिका महेश मांजरेकर पार पाडणार आहेत
प्रोमो आऊट झाल्यानंतर या कार्यक्रमात कोणकोण सेलिब्रेटी सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांच लागली आहे. या कार्यक्रमात उषा नाडकर्णी सहभागी होणार असल्याचे आपल्याला समजले आहे. उषा नाडकर्णींसोबत यात रोडिजचा स्पर्धक शिक ठाकरे सुद्धा सहभागी होणार असल्याचे समजते आहे. शिव हा मुळाचा अमरावतीचा आहे. व्यवसायाने तो कॉरियोग्राफर आहे.