रितेशने जागवल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 13:42 IST2016-09-14T08:12:26+5:302016-09-14T13:42:26+5:30
रितेश देशमुख बँजो या त्याच्या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच डान्स प्लस 2 ...

रितेशने जागवल्या आठवणी
र तेश देशमुख बँजो या त्याच्या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच डान्स प्लस 2 या कार्यक्रमाच्या सेटवर नर्गिस फाखरीसोबत पोहोचला होता. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहून रितेश थक्कच झाला. त्यानेही स्पर्धकांसोबत अनेक गाण्यांवर ताल धरला. अपना सपना मनी मनी या चित्रपटातील अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे या गाण्यावर त्याने रेमो डिसोझासोबत नृत्य सादर केले. विशेष म्हणजे या गाण्याची कोरिओग्राफी रेमोनेच केली होती. त्यामुळे या गाण्याच्या निमित्ताने रेमो आणि रितेशच्या या चित्रीकरणाच्यावेळेच्या आठवणी जाग्या झाल्या.