रितेश झाला भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 14:14 IST2016-12-08T14:14:24+5:302016-12-08T14:14:24+5:30

विकता का उत्तर या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख आणि सुहास नार्वेकर यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

Ritesh got emotion | रितेश झाला भावूक

रितेश झाला भावूक

कता का उत्तर या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख आणि सुहास नार्वेकर यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच मुंबईचे ६४ वर्षीय गृहस्थ सुहास नार्वेकर यांनी साकारलेली नटसम्राटांची भूमिका अंगावर रोमांच उमटविणारी ठरणार आहे. आय. टी . कन्सल्टंट म्हणून अनेक वर्ष विविध शहरात त्यांनी काम केले होते, निवृत्तीनंतर ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम करीत आहेत. प्रगल्भ वाचन आणि प्रतिभावंत असलेले सुहास नार्वेकर यांचे व्यक्तिमत्व रसिकांना भारावून टाकणारे आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एक आठवण त्यांनी सदर कार्यक्रमात शेअर केली. १९९५ मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुहास यांचा त्यांच्याशी परिचय झाला होता. त्यावेळी सुहास आय. टी. सेक्टरमध्ये कामाला होते. त्यादरम्यान सुहास आणि विलासराव देशमुखांचे आय.टी. संदर्भात काही बोलणे झाले होते. मात्र ही भेट अंशकालीन असल्याने विलासराव आपल्याला स्मरणात ठेवतील अशी कल्पना देखील सुहास यांना नव्हती. कालांतराने विलासराव देशमुख २००४ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर रुजू झाले, मात्र त्याकाळात सुहास सेवानिवृत्त झाले होते. असे असले तरीही त्यांनी सुहास यांची जातीने दखल घेत एका सॉफ्टवेअर डेवलपर्सच्या प्रमुख पदावर काम करण्याविषयी त्यांना घरी पत्र पाठवले होते. इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची ही संधी माज्यासाठी स्वप्नच होते, अशी एक अविस्मरणीय आठवण सुहास यांनी सांगितली. आपल्या वडिलांची ही आठवण ऐकताना कार्यक्रमाचा होस्ट असणाºया रितेशला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत. रितेशनेदेखील आपल्या आठवणींना उजाळा देत त्याचे आणि त्याच्या वडिलांच्या नात्याबद्दलचे अनेक वेगळे पैलू मांडले. 
             




Web Title: Ritesh got emotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.