समीक्षा जैस्वालने जिंदगी की महक या मालिकेसाठी कमी केले वजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 16:13 IST2017-01-16T16:13:04+5:302017-01-16T16:13:04+5:30
जिंदगी की महक या मालिकेत महकची भूमिका साकारणाऱ्या समीक्षा जैस्वालच्या अभिनयाला लोकांची पसंती मिळत असल्याने ती सध्या खूपच खूश ...

समीक्षा जैस्वालने जिंदगी की महक या मालिकेसाठी कमी केले वजन
ज ंदगी की महक या मालिकेत महकची भूमिका साकारणाऱ्या समीक्षा जैस्वालच्या अभिनयाला लोकांची पसंती मिळत असल्याने ती सध्या खूपच खूश आहे. मालिकेत महकला लोकांना विविध पदार्थ बनवून घालण्याची आवड आहे. पण खऱ्या आयुष्यात ती तिच्या जीभेला चांगलाच ताबा ठेवते. या मालिकेत आता महकचे लग्न होणार असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सध्या मालिकेत तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. महक या व्यक्तिरेखेच्या लग्नाची तयारी समीक्षा तर गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहे. ती लग्नाच्या चित्रीकरणासाठी गेल्या दोन महिन्यांपासून डाएट आणि खूप सारा व्यायाम करत आहे. गेल्या दोन महिन्यात तिने डाएट आणि व्यायाम करून तब्बल आठ किलो वजन कमी केले आहे. यामुळे ती आता अधिकच सुंदर दिसू लागली आहे. लग्नाच्या पोशाखात अधिक सुंदर दिसण्यासाठी तिने इतकी मेहनत घेतली आहे. याविषयी समीक्षा सांगते, "या मालिकेत माझे लग्न कधी दाखवले जाणार याची मी गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहे. मला या लग्नप्रसंगाविषयी जेव्हा कळले तेव्हा मी लगेचच वजन कमी करायचे ठरवले. मी बाहेरचे खाणेदेखील बंद केले. मी आता सेटवर न चुकता डबा घेऊन जाते. तसेच दोन-दोन तासांनी काहीतरी खाते. मी गोड पदार्थ अजिबातच खात नाहीये. तसेच मी रोज जॉगिंग करते आणि सायकल चालवते. लिफ्टचा वापर न करता जिन्याने पायऱ्या चढते. या सगळ्यामुळेच मला वजन कमी करणे शक्य झाले आहे. माझा हा नवा लूक मला स्वतःलाच खूप आवडत आहे."
दोन महिन्यांपूर्वीची समीक्षा जैस्वाल
![Samiksha Jaiswal who plays Mehek in Zindagi Ki Mehek]()
समीक्षाने मालिकेतील लग्नासाठी तब्बल आठ किलो वजन कमी केले आहे
![Samiksha Jaiswal who plays Mehek in Zindagi Ki Mehek]()
दोन महिन्यांपूर्वीची समीक्षा जैस्वाल
समीक्षाने मालिकेतील लग्नासाठी तब्बल आठ किलो वजन कमी केले आहे