विलासने राधाला दिले सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2017 17:09 IST2017-05-13T11:39:08+5:302017-05-13T17:09:08+5:30
गोठ मालिकेत राधा आणि विलास यांचे नाते दिवसेंदिवस बहरते आहे. दोघांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे. विलास ...
.jpg)
विलासने राधाला दिले सरप्राईज
ग ठ मालिकेत राधा आणि विलास यांचे नाते दिवसेंदिवस बहरते आहे. दोघांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे. विलास राधाला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज देतो. तर दुसरीकडे राधाची बहिण नीला विलासच्या प्रेमात आहे. ती काहीही करून विलासला मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. विलास नीलाची तिची समजूत काढत असताना तिच्याकडून त्याला राधाचा वाढदिवस असल्याचं कळतं. सुलेखा आणि दीप्तीच्या मदतीनं विलास राधाला वाढदिवसाचे सरप्राईज देण्याचा प्लॅन करतो. त्याची आणि राधाची अंदळगावची आठवण म्हणून स्वत :राधाचे चित्र काढून तिला गिफ्ट करतो. तो राधाला स्वत: तिचे चित्र काढून गिफ्ट करतो. रात्री झोपलेल्या राधाला उठवून ते केक कापतात. विलासच्या सरप्राईजनं राधा खूप भारावून जाते. दुसऱ्या दिवशी, दीप्ती आणि सुलेखा विलास, राधा यांना ओवाळतात. बर्थडे गिफ्ट म्हणून त्यांच्या जोडीला 'विरा' हे नाव देतात. या सगळ्यानं राधा आनंदित होते. गँग्ज ऑफ म्हापसेकर्स अर्थात दीप्ती आणि सुलेखा विलासला गाण्याचा, त्या गाण्यावर राधाला नाचण्याचा आग्रह करतात. राधाच्या बर्थ डे सेलिब्रेशन चालू असतानाच तीर्थ यात्रेला गेलेल्या बयोआजींचा घरात प्रवेश होतो. हे सगळ पाहुन त्यावर आता बयोआजी का बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बयोआजी या मालिकेत नेहमी आपल्याला जुन्या परंपरा आणि रुढींचा पुरस्कार करताना दिसतात तर राधा ही आजच्या जगातील मुक्त विचार करणारी मुलगी आहे.