बिग बॉसच्या घरात प्रेग्नंट झाली होती ही स्पर्धक, धरावा लागला होता बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 02:50 PM2019-10-07T14:50:09+5:302019-10-07T14:52:39+5:30

. मासिक पाळी न आल्याने अनवाँटेड प्रेग्नेंसीची भीती तिला सतावत होती.मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचे म्हणणे काही वेगळेच होते.

Remember Sakshi Pradhan Who Got Pregnant In Bigg Boss - Season 4 | बिग बॉसच्या घरात प्रेग्नंट झाली होती ही स्पर्धक, धरावा लागला होता बाहेरचा रस्ता

बिग बॉसच्या घरात प्रेग्नंट झाली होती ही स्पर्धक, धरावा लागला होता बाहेरचा रस्ता

googlenewsNext


बिग बॉस  हा शो पहिल्या सीझनपासून या ना त्या कारणामुळं वादाच्या भोव-यात सापडला. स्पर्धकांचं वागणं, शोमधील अश्लीलता यावरुन या शोची कायमच चर्चा झाली. या शोमध्ये अफेअर होणं, किसिंग सीन आणि स्क्रीपटेड लग्नसोहळा रचणं हे बिग बॉसमध्ये रसिकांनी पाहिलं होतं. या सगळ्याच गोष्टीचा साक्षीदार बिग बॉसचं घर बनल्याचे पाहायला मिळाले. मात्र बिग बॉसच्या घरात अशी एक गोष्ट घडली आहे जी वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जे आजवर कधीही समोर आलं नाही असं बिग बॉसच्या घरातलं धक्कादायक वास्तव समोर आलं होते. चौथ्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक होती जिचं नाव होतं साक्षी प्रधान. 


बिग बॉसच्या घरात साक्षीला हवं तेव्हा डॉक्टरांसोबत कन्सल्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. यावरुनच ती प्रेग्नेंट असल्याची बातमी समोर आली होती. इतकेच नाही तर तिने श्वेता तिवारी, वीणा मलिक आणि सारा खानला तिची मासिक पाळी चुकल्याचेही शोमध्ये सांगितले होते. मासिक पाळी न आल्याने अनवाँटेड प्रेग्नेंसीची भीती तिला सतावत होती.मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचे म्हणणे काही वेगळेच होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षीने प्रेग्नेंसीची बातमी खोटी असल्याचे म्हटले होते. ती म्हणाली होती, मी आता फक्त 21 वर्षांची आहे. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. मी प्रेग्नेंट कशी असू शकते.

साक्षी प्रधान 'स्प्लिट्सविला' या डेटिंग रिअॅलिटी शोच्या दुस-या पर्वाची विजेती आहे. इतकेच नाही तर तिचा एक एमएमएस लीक झाला होता. या व्हिडिओत साक्षी एका तरुणासोबत इंटीमेट होताना दिसली होती. याच कॉन्ट्रोव्हर्सीमुळे साक्षीला बिग बॉस या शोची ऑफर मिळाली होती. 

Web Title: Remember Sakshi Pradhan Who Got Pregnant In Bigg Boss - Season 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.