‘क्या हाल मिस्टर पांचाल?’मालिकेच्या भूमिकेसाठी रीना अगरवाल शिकते आहे फ्रेंच भाषा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 14:27 IST2017-09-15T08:57:24+5:302017-09-15T14:27:24+5:30
माणसाने शिकणे कधी थांबवू नये, असे म्हणतात.‘स्टार भारत’ (नव्या स्वरूपातील ‘लाईफ ओके’ वाहिनी) या वाहिनीवरील ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ ...
.jpg)
‘क्या हाल मिस्टर पांचाल?’मालिकेच्या भूमिकेसाठी रीना अगरवाल शिकते आहे फ्रेंच भाषा!
म णसाने शिकणे कधी थांबवू नये, असे म्हणतात.‘स्टार भारत’ (नव्या स्वरूपातील ‘लाईफ ओके’ वाहिनी) या वाहिनीवरील ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या नव्या लिकेत प्रेमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रीना अगरवाल ही या भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यासाठी सर्व ते यत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणजे ती त्यासाठी फ्रेंच भाषा शिकत आहे.नाचे या मालिकेतील सारे संवाद बहुतांशी फ्रेंच भाषेतून असल्याने तिने ही भाषा शिकण्यासाठी एक फ्रेंच शिक्षक नेमला हे. तो रोज सेटवर येतो आणि रीनाला तिचे संवाद कसे बोलायचे ते सांगतो. संदर्भात आम्ही रीनाकडे विचारणा केली असता तिने सांगितले, “या भूमिकेसाठी मला फ्रेंच भाषा शिकावी लागेल, असं मला निर्मात्यांनी सांगताच मला अतिशय आनंद झाला. आता सेटवर रोज एक फ्रेंच शिक्षक येतो आणि तो मला मार्गदर्शन करतो. त्याच्या प्रशिक्षणामुळे मला संवाद म्हणताना खूपच पायदा होतो. मला हा अनुभव खूपच छान वाटतो आणि या मालिकेत भूमिका मिळाल्यामुळे मी स्वत:ला सुदैवी समजते.”आपल्या मुलाच्या पत्नीत पाच विशेष गुण असावेत, अशी इच्छा बाळगणा-या आईला पाच सुना मिळतात आणि त्यामुळे उदभविणा-या पेचप्रसंगांचे चित्रण ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत विनोदी पध्दतीने केले आहे. आपल्या अतिआग्रही स्वभावामुळे सासूला कसे अनेक त्रास सोसावे लागतात, हे दर्शविणारी ही मालिका आहे. कधी कधी गरजेपेक्षा अधिक गोष्टींची मागणी ही संकटांना निमंत्रण देते, हे या मालिकेत हलक्याफुलक्या पध्दतीने दाखविले आहे. आपली सून अगदी परिपूर्ण आणि निर्दोष असावी, याची हाव धरणे अयोग्य असून आपल्या सुनांकडून सासवांनी अवाजवी अपेक्षा करू नयेत, असा संदेश ही मालिका देते.या मालिकेत एक आई आपल्या मुलाला सर्वगुणसंपन्न पत्नी मिळावी यासाठी देवाकडे नवस करते. पण एका मुलीत सगळेच गुण नसल्याने देवाच्या आशीर्वादामुळे तिच्या मुलाचे लग्न पाच मुलींशी होते आणि तिथून सुरू होते या मालिकेत खरी धमाल-मस्ती.क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेची निर्मिती विपुल डी शाह यांनी केली असून या मालिकेत कांचन गुप्ता आणि मनिंदर सिंग यांची मुख्य भूमिका आहे.