या कारणामुळे परागने सोडली ब्रम्हराक्षस ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 11:01 IST2016-10-21T11:01:40+5:302016-10-21T11:01:40+5:30

पराग त्यागी ब्रम्हराक्षस या मालिकेत ब्रम्हराक्षस ही प्रमुख भूमिका साकारत होता. त्याची ही भूमिका त्याने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच ...

For this reason, the series of pollen left off pollen | या कारणामुळे परागने सोडली ब्रम्हराक्षस ही मालिका

या कारणामुळे परागने सोडली ब्रम्हराक्षस ही मालिका

ाग त्यागी ब्रम्हराक्षस या मालिकेत ब्रम्हराक्षस ही प्रमुख भूमिका साकारत होता. त्याची ही भूमिका त्याने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी होती. तसेच या मालिकेतील त्याचा लुकही खूप वेगळा होता. या भूमिकेसाठी त्याचा मेकअपच खूप वेगळा करण्यात आला होता. हा मेकअप करण्याासाठी त्याला जवळजवळ दोन-अडीज तास लागत असत. परागसाठी ही भूमिका खूप महत्तवाची असूनही त्याने ही मालिका नुकतीच सोडली. या मालिकेत ब्रम्हराक्षसचा मृत्यू झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. परागने ही मालिका सोडण्यामागे काय कारण आहे याची कल्पना कोणालाच नव्हती. पण मालिका सोडण्यामागे एक खास कारण असल्याचे आता कळतेय. पराग सरकार 3 या चित्रपटात काम करणार आहे. सरकार, सरकार 2 या चित्रपटाच्या यशानंतर राम गोपाल वर्मा सरकार 3 हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
सरकार 3 या चित्रपटातील परागची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तो एका मूक व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. परागने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातदेखील केली आहे. या चित्रपटात त्याचे अनेक दृश्य अमिताभ बच्चन यांच्यासोबत आहेत. त्यामुळे सध्या तो त्यांच्यासोबत चित्रीकरण करत आहे. पराग त्यागीचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात त्याला बॉलिवुडच्या सुपरस्टारसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. परागने पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. त्यानंतर जोधा अकबर या कार्यक्रमात तो झळकला. तसेच नच बलिये या कार्यक्रमात त्याचे नृत्यकौशल्यही प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.




 

Web Title: For this reason, the series of pollen left off pollen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.