मीरा देवस्थळेने या कारणासाठी केले तब्बल 15 किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 04:53 PM2018-10-26T16:53:10+5:302018-10-26T17:05:31+5:30

कलर्सचा लोकप्रिय सामाजिक मालिका 'उडान'मधील चकोर ही भूमिका साकारणाऱ्या  मीरा देवस्थळेने तिच्या पडद्यावरील व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे

For this reason, Meera Devasthale lose15 kilos weight | मीरा देवस्थळेने या कारणासाठी केले तब्बल 15 किलो वजन

मीरा देवस्थळेने या कारणासाठी केले तब्बल 15 किलो वजन

googlenewsNext

कलर्सचा लोकप्रिय सामाजिक मालिका 'उडान'मधील चकोर ही भूमिका साकारणाऱ्या  मीरा देवस्थळेने तिच्या पडद्यावरील व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. पडद्याच्या बाहेर साधे जीवन जगण्याला प्राधान्य देणारी मीरा मालिकेमध्ये उत्सवी वातावरणाचा आनंद घेत आहे आणि एका आकर्षक पोशाखात दिसणार आहे. तिच्या पात्राला न्याय देण्यासाठी या अभिनेत्रीने काहीही करणे बाकी ठेवले नाही. करवाचौथचा उत्सव साजरा करणाऱ्या सध्या चालू ट्रॅक मध्ये मीरा लाल रंगाचा एक चमकदरा लेहेंगा घालताना दिसणार आहे आणि त्याचे वजन 15 किलो आहे.

तिच्या आकर्षक पोशाखा विषयी बोलताना, मीरा म्हणाली, “पोशाख बघताना माझ्या मन द्विधा झाले होते की हा इतका जड पोशाख मी कसा घालणार, पण जेव्हा मी तो आकर्षक पोशाख घातला तेव्हा मला खरी वधू असल्या सारखे वाटले.माझी हेअरस्टाइल सुध्दा पारंपारिक होती. वर बांधलेला बन आणि त्या भोवती सुंदर गुलाब लावलेले होते. करवा चौथच्या सिक्वेन्सचे शूटींग करताना मला अतिशय मजा आली. मला आशा आहे की प्रेक्षकांनाही असाच आनंद येईल.”


उडान मधील चकोर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीरा देवस्थळेला तर या मालिकेमुळे चांगलाच फायदा झाला आहे. ती आज भारतीय टेलिव्हिजन वरील लाडक्या पात्रांपैकी एक आहे. आझादगंजमधील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ती झटत असते. तसेच वेठबिगारी विरुद्ध ती शूरपणे लढत आहे असे या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते. यामुळे चकोर अनेकांसाठी प्रेरक ठरली आहे आणि आता तर ती रॉ मध्ये सामील होत आहे. देशाच्या अभिमानासाठी ती लढणार आहे. हे पात्र साकारण्यासाठी मीरा देवस्थळेने कठोर परिश्रम घेतले आहेत

Web Title: For this reason, Meera Devasthale lose15 kilos weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.