​या कारणामुळे मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेत काम करण्यास उत्सुक आहे लुब्ना सलिम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 06:42 AM2018-05-28T06:42:56+5:302018-05-28T12:12:56+5:30

‘मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका छोटी मुलगी मरियम आणि ...

For this reason, Mary Khan - Reporting Live is eager to work in the series Lubna Salim | ​या कारणामुळे मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेत काम करण्यास उत्सुक आहे लुब्ना सलिम

​या कारणामुळे मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेत काम करण्यास उत्सुक आहे लुब्ना सलिम

googlenewsNext
रियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका छोटी मुलगी मरियम आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घटनांवरील तिच्या दृष्टिकोनाची गोष्ट आहे.
बा बहू और बेबी या मालिकेत लुब्ना सलिमने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तिने अनेक मालिकांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. तसेच ओह माय गॉड या चित्रपटात ती परेश रावलच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती. लुब्नाने केवळ छोट्या पड्यादवरच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही खूपच चांगल्या भूमिका साकरल्या आहेत. आज लुब्ना हे छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावरचे मोठे नाव आहे. ती नुकतीच चक्रव्यूह या मालिकेत दिसली होती आणि आता मरियम खान - रिपोर्टिंग लाईव्ह या मालिकेत ती एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेतील लुब्नाची भूमिका खूपच चांगली असल्याने या मालिकेत काम करण्यास ती खूपच उत्सुक आहे. पण यासोबतच या मालिकेत काम करण्यास ती आनंदित असण्यामागे एक खास कारण आहे. सलिम आरिफ हे या मालिकेच्या निर्मात्यांपैकी एक आहे. सलिम हे लुब्नाचे पती असून त्यांच्यासोबत पहिल्यांदाच ती एकत्र काम करणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने या दोघांना सेटवर एकत्र वेळ घालवता येणार असल्याने लुब्ना खूप खूश आहे. याविषयी ती सांगते, “माझ्या पतींसोबत काम करायला मिळणार असल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे. ते खाजगी आयुष्यात कसे आहेत हे मला माहीत आहे. ते सेटवर देखील मस्तीखोर आहेत का हे पाहणे खूपच मजेशीर असणार आहे. मी या मालिकेत काम करण्यास खूपच उत्सुक आहे.”
‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ ही मालिका स्टार प्लसवर नुकतीच सुरू झाली असून प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडे सात वाजता पाहायला मिळत आहे. या मालिकेची कथा ही खूप वेगळी असल्याने अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह मालिकेत नऊ वर्षांची चिमुरडी देशना दुगड मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. भोपालच्या पार्श्वभूमीवर या मालिकेची कथा असून या मालिकेपूर्वीही देशनाने 'इस प्यार को क्या नाम दूँ' आणि 'बाल कृष्ण' या मालिकेत काम केले आहे. 

Also Read : ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ फेम ​खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमानने अभिनयासोबतच सुरू केले हे काम

Web Title: For this reason, Mary Khan - Reporting Live is eager to work in the series Lubna Salim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.