प्रसिद्ध अभिनेत्रीने तडकाफडकी सोडली मुंबई, समोर आले हे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 13:58 IST2021-11-13T13:55:41+5:302021-11-13T13:58:53+5:30
अभिनेत्रीचे एअरपोर्टचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेला आले उधाण.

प्रसिद्ध अभिनेत्रीने तडकाफडकी सोडली मुंबई, समोर आले हे कारण
सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. गेल्या काही महिन्यांत रसिकांचे लाडके कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. आता आणखी काही कलाकार मंडळी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. 'कुंडली भाग्य' मालिकेतील अभिनेत्री श्रद्धा आर्यासुद्धा बोहल्यावर चढणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे.श्रद्धा आर्याने तिच्या लग्नाविषयी चांगलीच गुप्तता पाळली आहे. लवकरच आता लग्नापूर्वी पार पडणारे कार्यक्रमांनाही सुरुवात होणार आहे. त्यासाठी श्रद्धा तिच्या घरी गेली आहे. नुकतेच श्रद्धाला एरअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले होते.
एअरपोर्टवरील तिचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मीडियाला पाहताच श्रद्धानेही एक से बढकर एक पोज दिल्याचे पाहायला मिळाले. श्रद्धाच्या लग्नाची बातमी समोर येताच चाहत्यांनाही तिच्या लग्नाविषयी सगळ्याच गोष्टी जाणून घेण्यात उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे सध्या सोसल मीडियावर नजर टाकल्यास तिच्या लग्नावर जास्त चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रद्धाच्या चाहत्यांचा मात्र चांगलाच हिरमोडही झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहीजण तिच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. लवकरच लग्नबंधनात अडकणार म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे.
श्रद्धाचा होणारा नवरा कोण याविषयी चर्चा होत आहे. श्रद्धाच्या भावी पतीविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. होणाऱ्या पतीचे नाव राहुल असून नेवी ऑफिसर असल्याची इतकीच माहिती समोर आली आहे. यापूर्वी श्रद्धा आर्याने 2015 साली एनआरआय जयंतसोबत साखरपुडा केला होता. मात्र दोघांनाही काही काळानंतर काही गोष्टी खटकायला सुरुवात झाली. त्यामुळे लग्नापर्यंत त्यांच नातं काही पोहचलं नाही. तिथेच दोघांनी ब्रेकअप केले होते.