​या कारणामुळे संध्याने मालिकेत काम न करण्याचे ठरवले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 15:35 IST2016-11-15T15:35:04+5:302016-11-15T15:35:04+5:30

पी.ए.डब्ल्यू बंदी युद्ध के या मालिकेत संध्या मृदूल काम करत आहे. संध्या जवळजवळ दहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. ...

For this reason, the evening decided not to work in the series | ​या कारणामुळे संध्याने मालिकेत काम न करण्याचे ठरवले होते

​या कारणामुळे संध्याने मालिकेत काम न करण्याचे ठरवले होते

.ए.डब्ल्यू बंदी युद्ध के या मालिकेत संध्या मृदूल काम करत आहे. संध्या जवळजवळ दहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. तिने कारकिर्दीच्या सुरुवातीला बनेगी अपनी बात, स्वाभिमान यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. तिच्या अाशीर्वाद, कोशिश एक आशा या मालिका खूप गाजल्या होत्या. छोट्या पडद्यावर मिळालेल्या प्रसिद्धीनंतर ती मोठ्या पडद्यावर वळली. साथिया, पेज 3 यांसारख्या हिट चित्रपटात ती झळकली. तिने साकारलेल्या सगळ्याच भूमिकांचे कौतुक करण्यात आले. दरम्यानच्या काळात तिने झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्येदेखील भाग घेतला होता. छोट्या पडद्यावर रिअॅलिटी शोमध्ये ती काम करत असली तरी तिने मालिकांमध्ये काम न करणेच पसंत केले. मालिकांमध्ये काम न करण्याचे खास कारण होते. मालिकांच्या पटकथा या सशक्त नसल्याने तिने छोट्या पडद्यापासून दूर राहायचे ठरवले होते. याविषयी ती सांगते, "मी छोट्या पडद्याकडे पाठ फिरवली होती असे नव्हते तर चांगल्या आणि दर्जेदार कथानकांनीच छोट्या पडद्याकडे पाठ फिरवली आहे. माझ्यासाठी कथानक हे अधिक महत्त्वाचे असते. चित्रपट अथवा मालिका स्वीकारताना मी सगळ्यात पहिल्यांदा कथानकाचाच विचार करते. मला एकाच साच्यातल्या भूमिका करायला आवडत नाहीत. त्यामुळे मी आतापर्यंत साकारलेल्या सगळ्याच भूमिका खूप वेगळ्या आहेत. भविष्यात चांगल्या भूमिका ऑफर झाल्या तरच मी मालिकांमध्ये झळकेल. सध्या निखिल अडवाणी, महेश भट्ट यांसारखे मोठ्या पडद्यावरचे प्रसिद्ध दिग्दर्शक छोट्या पडद्यावर परतत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना चांगल्या मालिका भविष्यात पाहायला मिळतील अशी मला आशा आहे." 


Web Title: For this reason, the evening decided not to work in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.