​या कारणामुळे बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खानविरोधात झाली तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 09:58 IST2017-10-09T04:28:01+5:302017-10-09T09:58:01+5:30

शनिवारी वीकेंडला टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खानने घरवाल्यांचा चांगलाच क्लास घेतला. पण या सर्वांत कन्टेस्टंट जुबैर ...

This is the reason for the complaint lodged against Big Boss's director Salman Khan | ​या कारणामुळे बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खानविरोधात झाली तक्रार दाखल

​या कारणामुळे बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खानविरोधात झाली तक्रार दाखल

िवारी वीकेंडला टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खानने घरवाल्यांचा चांगलाच क्लास घेतला. पण या सर्वांत कन्टेस्टंट जुबैर खान याच्यावर सलमान चांगलाच संतापला. जुबैरने बिग बॉसच्या घरात एंट्री केल्यापासूनच तो सगळ्यांशी प्रचंड भांडत आहे. तसेच तो सगळ्यांशी उद्धटपणे बोलत आहे. यावरून सलमानने जुबैरचा चांगलाच क्लास घेतला. पण हा क्लास सलमानच्या अंगाशी आला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
सलमान शनिवारच्या भागात जुबैरला म्हणाला होता की, ‘ जब तुम यहाँ आए थे तो तुम्हारी कोई औकात वैसे ही नहीं थी.  यह किसी का दामाद नहीं है. जिस परिवार से यह अपना नाम जोड़ता है इसका उससे कोई लेना-देना नहीं है. अपनी औकात दिखानी है न तो निकाल गंदगी मेरे सामने. जुबैर यहां अपनी इमेज बनाने आया है या इमेज डुबाने आया है.’ सलमानचे हे शब्द जुबैरच्या चांगलेच जिव्हारी लागले असल्याने त्याने गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. आता त्याची तब्येत चांगली आहे. पण या सगळ्यात आता सलमानवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
महाराष्ट्रातील लोणावळा येथील पोलिस स्टेशनमध्ये सलमानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिग बॉसचा स्पर्धक जुबैरने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे की, सलमानने बिग बॉस या कार्यक्रमात मला धमकी दिली असून तू घरातून बाहेर पडल्यावर इंडस्ट्रीत तू काम करू शकणार नाही नाही असे मला धमकी देताना तो म्हणाला. तसेच तू घर सोडल्यावर मी तुला माझा कुत्रा बनवणार आहे. तसेच तू बाहेर ये, तुला मी सोडणार नाही असे कॅमेऱ्याच्यासमोर सलमानने म्हटले असल्याचे जुबैरने तक्रारीत नमूद केले आहे. 
जुबैद हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा नातलग असल्याचे म्हटले जाते. जुबैदने गोळ्या घालल्यानंतर त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जुबैदला गेल्या आठवड्यात लोकांकडून सर्वात कमी मतं मिळाल्याने त्याला हा कार्यक्रम सोडावा लागला. 

Also Read : लहानपणीच हरपले वडिलांचे छत्र; आता असे आयुष्य जगतो ‘बिग बॉस’चा हा जल्लाद!

Web Title: This is the reason for the complaint lodged against Big Boss's director Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.