जाणून घ्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत कमबॅक करण्याविषयी काय सांगतेय दिशा वाकानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:31 IST2018-07-02T15:01:06+5:302018-07-02T17:31:33+5:30

दिशा वाकानी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी दया गेल्या अनेक महिन्यांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून गायब आहे. ती मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

Read what Disha Vakani has to say about her comeback in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | जाणून घ्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत कमबॅक करण्याविषयी काय सांगतेय दिशा वाकानी

जाणून घ्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत कमबॅक करण्याविषयी काय सांगतेय दिशा वाकानी

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेमुळे दिशा वाकानीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज प्रेक्षक दिशाला दयाबेन म्हणूनच ओळखतात. 
दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. चित्रीकरणाच्या वेळी मालिकेची संपूर्ण टीम तिची खूप काळजी घेत असे. तसेच तिला त्रास होऊ नये यासाठी तिला काहीच तास चित्रीकरणासाठी बोलावले जात असे. या सगळ्यामुळेच तिला तिच्या मुलीच्या जन्माच्या काही दिवस आधीपर्यंत चित्रीकरण करणे शक्य होत होते. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून दूर आहे. प्रेक्षकांची लाडकी दया मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
दयाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. दया या मालिकेत परतायला काही महिन्यांचा अवधी अजून लागणार आहे. दयानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना याविषयी सांगितले आहे. दयाने सोशल मीडियावर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील फोटो शेअर करून त्यासोबत लिहिले आहे की, मी मालिकेत परत यावे असे तुम्ही मला सतत सांगत आहात. मी देखील माझी ही मालिका, त्यातील व्यक्तिरेखा खूप मिस करत आहे. त्यामुळे या मालिकेत परतायला मला नक्कीच आवडेल. पण सध्याच्या परिस्थितीत माझ्यासाठी ते शक्य नाहीये. मला तुम्ही समजून घेतल्याबद्दल तुमचे आभार. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका पाहात राहा आणि या मालिकेवर नेहमीसारखे भरभरून प्रेम करा...
दिशाने खिचडी या मालिकेत तर देवदास, जोधा अकबर यांसारख्या मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण तिला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. 
 

Web Title: Read what Disha Vakani has to say about her comeback in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah