रवी जाधव यांनी दिल्या बिग बींना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 09:36 IST2016-03-29T16:36:33+5:302016-03-29T09:36:33+5:30

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे व्यक्तीमहत्व असलेले अमिताभ बच्चन या स्टार कलाकाराला भेटण्याची इच्छा प्रत्येकाला असते. तसेच त्यांच्या बंगल्याबाहेर ...

Ravi Jadhav gave Big B's greetings | रवी जाधव यांनी दिल्या बिग बींना शुभेच्छा

रवी जाधव यांनी दिल्या बिग बींना शुभेच्छा

रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे व्यक्तीमहत्व असलेले अमिताभ बच्चन या स्टार कलाकाराला भेटण्याची इच्छा प्रत्येकाला असते. तसेच त्यांच्या बंगल्याबाहेर देखील बिग बींची एक झलक पाहण्यासाठी करोंडो चाहते उभे असतात. अशा या शहेनशहाला भेटण्याचा योग आला होता दिग्दर्शक रवी जाधव या दिग्दर्शकाला. रवी जाधव यांनी मराठी इंडस्ट्रीला टाइमपास, नटरंग, बालगंधर्व, बालक-पालक यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहे. मराठीच्या या स्टार दिग्दर्शकाने ही खास व अविस्मरणीय असलेली आठवण जागी केली ती बिग बींना पिकु या चित्रपटासाठी मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर. रवी जाधव यांनी नुकतेच सोशलमिडीयावर अमिताभ बच्चन यांच्यासोबतची एक आठवण शेअर करताना म्हणाले, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळणाºया या महान व दिग्गज कलाकाराला भेटण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद होत आहे. तसेच त्यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.

Web Title: Ravi Jadhav gave Big B's greetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.