Ravi Dubey Shocking Transformation: हाच का तो ? अभिनेता रवी दुबेचं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 14:06 IST2023-03-22T14:05:54+5:302023-03-22T14:06:23+5:30
Ravi Dubey : रवी दुबेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

Ravi Dubey Shocking Transformation: हाच का तो ? अभिनेता रवी दुबेचं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
अभिनेता रवी दुबे (Ravi Dubey) हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. रवीने आपल्या करिअरची सुरुवात दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्या 'स्त्री... तेरी कहानी' या मालिकेतून केली होती. यानंतर 'डोली सजा के'मध्ये दिसला. 'जमाई राजा' मधून त्याला खरी ओळख मिळाली. 'सास बिना ससुराल', 'नच बलिये', 'कॉमेडी सर्कस', 'खतरों के खिलाडी' सारख्या मालिकांमध्ये दिसला आणि नंतर ओटीटीमध्येही काम केले. सध्या अभिनेत्याचा 'फॅराडे' हा चित्रपट चर्चेत आहे.
अलीकडेच, रवी दुबेने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटोंचा कोलाज शेअर केला आहे, जो अपलोड होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलाजच्या एका बाजूला रवीचे मूळ चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचा 'फॅराडे' लूक आहे. दोन्ही फोटोंची तुलना केल्यास, लूकमध्ये फरक पाहायला मिळतो आहे. त्याचा हा लूक पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की तो रवी दुबे आहे. त्याचे हे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झालेत.
रवी दुबेने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. एक युजर म्हणाला, "क्या बात है सर." दुसरा युजर म्हणाला, "समर्पणाचे दुसरे नाव रवी दुबे आहे." अनेक लोक हार्ट आणि फायर इमोजीसह प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला 'बवाल' म्हणत आहेत. या लूकमुळे लोकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रवी दुबेचा 'फॅराडे' हा चित्रपट या वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.रवी दुबे स्वतः आणि त्यांची पत्नी सरगुन मेहता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अंकुर पजनी दिग्दर्शित करत आहेत. रवी दुबे आणि सरगुन मेहता यांनी निर्माते म्हणून अनेक चित्रपट आणि हिट मालिकांची निर्मिती केली आहे, ज्यात 'उडारिया' आणि 'जुनूनियत' यांचा समावेश आहे.