​द ड्रामा कंपनी फेम कृष्णा अभिषेकमुळे रवीना टंडनला बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 11:45 IST2017-09-09T06:15:52+5:302017-09-09T11:45:52+5:30

द ड्रामा कंपनी या कार्यक्रमाद्वारे कृष्णा अभिषेक, अली असगर, संकेत भोसले प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. त्यांचे सगळेच परफॉर्मन्स ...

Raveena Tandon gets hit due to Drama company Fame Krishna Abhishek | ​द ड्रामा कंपनी फेम कृष्णा अभिषेकमुळे रवीना टंडनला बसला धक्का

​द ड्रामा कंपनी फेम कृष्णा अभिषेकमुळे रवीना टंडनला बसला धक्का

ड्रामा कंपनी या कार्यक्रमाद्वारे कृष्णा अभिषेक, अली असगर, संकेत भोसले प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. त्यांचे सगळेच परफॉर्मन्स प्रेक्षकांना आवडत आहेत. हा कार्यक्रम सुरू होऊन केवळ काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांनी हा कार्यक्रम डोक्यावर घेतला आहे. 
द ड्रामा कंपनीच्या एका भागात रवीना टंडन झळकणार आहे आणि तिने नुकतेच या भागासाठी चित्रीकरण देखील केले. या भागाचे चित्रीकरण झाल्यानंतर ती प्रचंड खूश होती. या कार्यक्रमातील कलाकारांचे परफॉर्मन्स पाहून तिला अक्षरशः शॉक लागला होता. रवीनावर चित्रीत करण्यात आलेले मोहरा या चित्रपटातील टीप टीप बरसा पाणी हे गाणे चांगलेच गाजले होते. या गाण्यातील रवीनाचे हावभाव, तिचे दिसणे तिच्या फॅन्सना प्रचंड भावले होते. आज या गाण्याला अनेक वर्षं होऊनही हे गाणे प्रेक्षकांच्या मनात तितकेच ताजे आहे. अनेकवेळा रवीनादेखील या गाण्यावर विविध कार्यक्रमांमध्ये, पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करताना आपल्याला दिसते. द ड्रामा कंपनी या कार्यक्रमातही प्रेक्षकांना हे गाणे पाहायला मिळणार आहे. पण हे गाणे रवीनावर नव्हे तर कृष्णा अभिषेकवर चित्रीत करण्यात आले. कृष्णाने टीप टीप बरसा पाणी या गाण्यावर दिलेला परफॉर्मन्स पाहून रवीनाला आश्चर्याचा धक्का बसला होता. कृष्णाने तंतोतंत तिच्यासारखाच परफॉर्मन्स सादर केला. त्यामुळे कोणताही कलाकार इतक्या चांगल्याप्रमाणे दुसऱ्या कलाकाराची मिमिक्री कशी काय करू शकतो असा रवीनाला प्रश्न पडला होता. कृष्णाने रवीनासारखीच पिवळ्या रंगाची साडी देखील घातली होती. त्यामुळे कृष्णाच्या फॅन्सना कृष्णाचे हे वेगळे रूप द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. 

Also Read : द ड्रामा कंपनी फेम संकेत भोसलेला त्याचे अश्रू का आवरले नाहीत?

Web Title: Raveena Tandon gets hit due to Drama company Fame Krishna Abhishek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.