रतन राजपूतचा विनयभंगाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:21 IST2016-01-16T01:05:56+5:302016-02-05T11:21:45+5:30

'संतोषी माँ' च्या चित्रिकरणादरम्यान सेटवरच लाइटमनने आपला विनयभंग केला असा आरोप प्रमुख भूमिकेत असलेल्या रतन राजपूत हिने केला आहे. ...

Rattan Rajput's molestation charges | रतन राजपूतचा विनयभंगाचा आरोप

रतन राजपूतचा विनयभंगाचा आरोप

'
;संतोषी माँ' च्या चित्रिकरणादरम्यान सेटवरच लाइटमनने आपला विनयभंग केला असा आरोप प्रमुख भूमिकेत असलेल्या रतन राजपूत हिने केला आहे. तिने प्रॉडक्शन हाऊसकडे याविषयी तक्रार केली आहे. मात्र सुरुवातीला काहीच कारवाई करण्यात आली नाही. रतनने चित्रीकरणाला नकार दिल्यानंतर लाईटमनची चौकशी करून कारवाई करण्यात आली. निर्मात्यांनी मात्र अशी काही घटना घडल्याचा इन्कार केला आहे. निर्माते म्हणाले, रतनने आम्हाला सांगितले की, याविषयी ती जास्त काही बोलू इच्छित नाही. पण फार काळ गप्पही राहू शकणार नाही. हे प्रकरण हाताळण्यास मी पुरेशी सर्मथ आहे. मला माध्यमांची मदत हवी आहे. मला प्रसिद्धीची हाव नाही, असे ती म्हणाली. रतन म्हणाली, अशा घटनांनी मुली निराश होऊ शकतात. मी तशी नाही. त्या व्यक्तीसोबत कसे निपटायचे हे मला चांगले कळते. या युनिटमध्ये 76 लोक असतील तर बाकीच्या लोकांना माहिती हवी की त्यांच्या सोबत कशाप्रकारचे लोक आहेत. रतनने दिल्लीत रंगभूमीवर दोन वर्षे काम केले आहे. ती म्हणाली, जेव्हा काही वाईट घडले तेव्हा मी त्याविरोधात बोलले आहे.

Web Title: Rattan Rajput's molestation charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.