आईच्या मांडीवर मस्ती करणाऱ्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? छोट्या पडद्यावर गाजवते अधिराज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 07:00 AM2022-06-16T07:00:00+5:302022-06-16T07:00:06+5:30

Apurva nemlekar: ही अभिनेत्री आज छोट्या पडद्यावर राज्य गाजवत असून तिच्या सौंदर्याने तिने अनेकांना घायाळ केलं आहे.

ratris khel chale fame marathi actress share her childhood photo on social media | आईच्या मांडीवर मस्ती करणाऱ्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? छोट्या पडद्यावर गाजवते अधिराज्य

आईच्या मांडीवर मस्ती करणाऱ्या 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? छोट्या पडद्यावर गाजवते अधिराज्य

googlenewsNext

सध्याच्या काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे पडद्यावर वावरणारे कलाकार या माध्यमातून सहज चाहत्यांसोबत जोडले जातात. अनेक कलाकार चाहत्यांसोबत लाइव्ह गप्पा मारतात तर काही वेळा ते त्यांच्या जीवनातील काही घडामोडी, घटना फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करतात. यात बऱ्याचदा हे कलाकार त्यांच्या बालपणीचेही फोटो शेअर करतात. यात सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्री फोटो व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री आज छोट्या पडद्यावर राज्य गाजवत असून तिच्या सौंदर्याने तिने अनेकांना घायाळ केलं आहे. परंतु, तिच्या बालपणीचा फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंदेखील अनेकांना कठीण झालं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक चिमुकली तिच्या आईच्या मांडीवर बसून मस्ती करताना दिसत आहे. ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar)आहे. 

दरम्यान, 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंता ही भूमिका साकारून अपूर्वा घराघरात पोहोचली. इतकंच नाही तर ती आज अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत असल्याचं पाहायला मिळतं. अपूर्वाने यापूर्वी अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे.
 

Web Title: ratris khel chale fame marathi actress share her childhood photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.